'आता रडतीये त्या दिवसांमध्ये..'; सिनेमा हिसकावल्याचा आरोप करणाऱ्या अमिषावर इशाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:22 PM2024-05-29T12:22:08+5:302024-05-29T12:33:37+5:30

Esha deol: बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचं वर्चस्व असून करीना कपूर आणि ईशा देओलने माझ्या हातून अनेक भूमिका हिसकावून घेतल्या, असा आरोप अमिषाने केला होता.

esha-deol-lashed-out-at-ameesha-patel-called-the-gadar-actress-is-a-liar | 'आता रडतीये त्या दिवसांमध्ये..'; सिनेमा हिसकावल्याचा आरोप करणाऱ्या अमिषावर इशाचा पलटवार

'आता रडतीये त्या दिवसांमध्ये..'; सिनेमा हिसकावल्याचा आरोप करणाऱ्या अमिषावर इशाचा पलटवार

बॉलिवूड अभिनेत्री इशा देओल (esha deol) हिचा पूर्वीपेक्षा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अभिनेत्री अमिषा पटेलवर टीकास्त्र डागलं आहे. एका मुलाखतीमध्ये अमिषाने स्टार किड्सविषयी भाष्य केलं होतं. इशा आणि करीनाने माझ्या हातून काही सिनेमा हिसकावले, असं वक्तव्य अमिषाने केलं होतं. या वक्तव्याचं उत्तर आता इशाने दिलं आहे.

एका मुलाखतीमध्ये अमिषाने स्टारकिड्सवर ताशेरे ओढले होते. बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचं वर्चस्व असून करीना कपूर आणि इशा देओलने माझ्या हातून अनेक भूमिका हिसकावून घेतल्या, असा आरोप अमिषाने केला होता. यावर,इशाने इंडिया टुडेशी बोलतांना अमिषाला उत्तर दिलं आहे.

काय म्हणाली इशा देओल?

"काय...खरंच ती असं म्हणाली? मला असं वाटतंय तिच्या विचारांपेक्षा माझे विचार फार वेगळे आहेत. आम्हाला जे काम दिलं होतं ती कामं करण्यात आम्ही सगळेच जण बिझी होतो. त्यावेळी माझी सगळ्यांशी चांगली मैत्री होती. आणि, माझ्या मते, कोणीही कोणाची भूमिका हिसकावून घेतलेली नाही", असं इशा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ज्या दिवसांचं उदाहरण देत आता ती रडतीये त्या दिवसांमध्ये आम्ही सगळ्या जणी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होतो. त्यावेळचा काळ खरंच खूप चांगला होता. एकदम मोकळं वातावरण होतं. त्यावेळी आमच्यात किंवा इंडस्ट्रीत कोणीही एकमेकांचं प्रतिस्पर्धी नव्हतं. आम्ही प्रत्येक जण काम करत होतो. प्रत्येकाकडे काम होतं. कोणीही बसून नव्हतं."

दरम्यान, २०२३ मध्ये अमिषाने बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली होती. यावेळी तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळावर भाष्य केलं. अमिषाने इंडस्ट्रीत पदार्पण केलं त्यावेळी करीना, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन, तुषार कपूर, इशा , फरदीन खान या स्टारकिड्सनेदेखील तिच्यासोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यामुळे या स्टारकिड्सला प्रत्येक सिनेमात प्रथम प्राधान्य दिलं जायचं असं तिने म्हटलं होतं.

Web Title: esha-deol-lashed-out-at-ameesha-patel-called-the-gadar-actress-is-a-liar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.