Esha Deol divorce: नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे ईशा देओलचा घटस्फोट? 'या' मुलीला डेट करत असल्याच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:24 PM2024-02-07T12:24:05+5:302024-02-07T12:24:50+5:30
Esha Deol divorce: एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
बॉलिवूडमध्येलग्न, घटस्फोट हे आता फारसं नवीन राहिलेलं नाही. कालच हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलने (Esha Deol)आपला १२ वर्षांचा संसार मोडल्याचं कन्फर्म केलं. ईशा आपल्या दोन्ही मुलींसह पती भरत तख्तानीपासून वेगळी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती पतीसोबत एकही फोटो शेअर करत नव्हती. केवळ हेमा मालिनीसोबतच तिच्या पोस्ट असायच्या. ईशाच्या घटस्फोटामागे पतीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे अशीही चर्चा आता होत आहे. एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
ईशा देओल आणि भरत तख्तानी (Bharat Takhtani) यांनी लग्नाच्या १२ वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. त्यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर ईशाचं भरतकडे दुर्लक्ष झालं. याचमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं ईशाने मान्य केलं आहे. मात्र या गोष्टीला आणखी एक बाजू आहे. भरत तख्तानीला काही महिन्यांपूर्वी बंगलोरमध्ये एका मुलीसोबत बघितलं गेलं. ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या. भरत तख्तानीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु होतं म्हणूनच ईशाने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ती मुलगी बंगलोरचीच असल्याचंही नंतर समजलं. BollyBlindsNGpossip पेजने यासंदर्भात पोस्ट केली होती. यानंतर भरतला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं.
ईशा देओल भरतसोबत एक नाही तर दोन वेळा लग्नबंधनात अडकली होती. 2012 साली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी थाटात लेकीचं लग्न लावून दिलं होतं. नंतर राध्या या पहिल्या मुलीच्या जन्मावेळी ईशा आणि भरतने इस्कॉन मंदिरात जाऊन पुन्हा लग्नाचे वचन घेतले होते. आदर्श जोडी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर ईशा आणि भरत दुरावले. याचाच परिणाम त्यांनी थेट घटस्फोटचाच निर्णय घेतल्याचं सध्या समोर आलं आहे.