"लग्नानंतर घरात कपड्यांवरुन...", 4 वर्षांपूर्वीच ईशाने सासूविषयी केले होते बरेच खुलासे; 'हे' होतं बंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 03:48 PM2024-02-08T15:48:59+5:302024-02-08T15:50:23+5:30
Esha Deol Divorce: ईशाने ४ वर्षांपूर्वीच केलेले अनेक खुलासे आता समोर येत आहेत
'धूम'गर्ल ईशा देओल (Esha Deol) लग्नाच्या १२ वर्षांनंतर पतीपासून विभक्त झाली आहे. ईशा आणि भरत तख्तानी कॉलेजपासून एकमेकांसोबत होते. २०१२ साली त्यांनी लव्हमॅरेज केलं. त्यांना राध्या आणि मिराया या मुलीही आहेत. लग्नानंतर ईशा मोठ्या पडद्यावरुन गायब झाली. लग्नानंतर आणि मुलींच्या जन्मानंतर ईशाचं आयुष्य खूपच बदललं होतं याचा उल्लेख तिने तिच्या पुस्तकात केला आहे. ईशाच्या घटस्फोटानंतर तिच्या पुस्तकातील अनेक ओळी आता व्हायरल होत आहेत.
2020 साली ईशाचं 'अम्मा मिया' हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. लग्नानंतर आपण जासतच मॅच्योर झाल्याचा ईशाने त्यामध्ये उल्लेख केला. ती लिहिते, "२०१२ मध्ये जेव्हा आमचं लग्न झालं त्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. जेव्हा मी भरतच्या घरी राहायला आले तेव्हा मी नेहमीप्रमाणे दिवसभर शॉर्ट्स किंवा गंजी घालून बसू शकत नव्हते. मला माझ्या जीवनशैलीत बदल करावा लागला. पण हेही खरं आहे की या कुटुंबाने मला लगेच आत्मसात केलं."
ती पुढे लिहिते, "या घरात महिला आपल्या पतीसाठी चविष्ट स्वयंपाक करुन डबा देतात. भरतला भेटायच्या आधी मला स्वयंपाकातलं काहीच येत नव्हतं. पण मला माझ्या सासूने कधीच मला किचनमध्ये येण्यासाठी जबरदस्ती केली नाही.तसंच सून म्हणून त्यांनी कधीच मला कर्मठ गोष्टी करायला लावल्या नाहीत. उलट त्या तर मला भरत आणि त्याच्या भावानंतर तिसरा मुलगाच मानायच्या. मी घरातील पहिली सून असल्याने माझे बरेच लाडही झाले. मला नेहमी चॉकलेट, ब्राऊनी, फळं दिले जायचे."
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा आणि भरतमध्ये दुरावा आला होता हे तिने पुस्तकात मान्य केले आहे. ईशाचं भरतकडे अजिबातच लक्ष नव्हतं. ती मुलींच्या संगोपनातच व्यस्त झाली होती. नवऱ्यासोबत ती बराच काळ बाहेर डेटवरही गेली नाही असं तिने लिहिलं होतं. घटस्फोटानंतर ईशाच्या पुस्तकातील अनेक ओळी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.