‘आधार’मुळे वैतागली ईशा गुप्ता, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 10:14 AM2019-06-14T10:14:44+5:302019-06-14T10:15:26+5:30

जन्नत, रूस्तम, बादशाहो अशा अनेक चित्रपटांतून आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या जाम वैतागली आहे. तिच्या या वैतागाचे कारण आहे, आधार कार्ड सेवा.

esha gupta angry in uidai after server goes down | ‘आधार’मुळे वैतागली ईशा गुप्ता, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

‘आधार’मुळे वैतागली ईशा गुप्ता, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

googlenewsNext
ठळक मुद्देईशा गुप्ता सर्रास आपल्या सोशल अकाऊंटवर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून अनेकदा ईशा ट्रोलही झाली.

जन्नत, रूस्तम, बादशाहो अशा अनेक चित्रपटांतून आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या जाम वैतागली आहे. तिच्या या वैतागाचे कारण आहे, आधार कार्ड सेवा. होय, अलीकडे ईशा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात युआयडीएआयवर भडकली आहे. सोशल मीडियावर तिने आपला संताप बोलून दाखवला.
ईशाने अलीकडे तिचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी युआयडीएआयची साईट उघडली असता तिला सर्व्हर डाऊन असल्याचे दिसले. वारंवार प्रयत्न करूनही सर्व्हर डाऊन असल्याने ही साईट उघडली नाही. यानंतर ईशाने सोशल मीडियावर आपली नाराजी बोलून दाखवली.

‘चांगली बातमी ही आहे की, गत दिवसांपासून युआयडीएआयचे सर्व्हर डाऊन आहे आणि वाईट बातमी म्हणजे, त्यामुळे मी काहीही करू शकली नाही. आधारशिवाय मी माझा प्रवास करू शकत नाही, यासाठी आभार...,’असे ट्वीट तिने केले. ती इथेच थांबली नाही तर तिने एका पाठोपाठ एक असे अनेक ट्वीट केलेत. तिच्या या ट्वीटनंतर युआयडीएआय आपल्या ऑफिशिअल ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत ईशाला तिची समस्या विचारली.  
हे प्रकरण इथेच थांबले नाही तर, या ट्वीटमुळे ईशाला ट्रोल व्हावे लागले.  यानंतर ईशाने संबंधित सर्व ट्वीट डिलीट केलेत.


 ईशा गुप्ता सर्रास आपल्या सोशल अकाऊंटवर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून अनेकदा ईशा ट्रोलही झाली. पण ईशाने कधीच या ट्रोलर्सची पर्वा केली नाही.  अलीकडे ईशा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होती. हार्दिक पंड्यासोबत तिचे नाव जोडले जात होते. पण कालांतराने हार्दिक व तिच्यात तसले काहीही नसल्याचे स्पष्ट झाले होते.

Web Title: esha gupta angry in uidai after server goes down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.