'या' एकमेव बॉलिवूड अभिनेत्रीला EURO CUP 2024 चं होतं आमंत्रण, स्पेनचा विजय प्रत्यक्ष पाहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:59 AM2024-07-18T10:59:32+5:302024-07-18T11:01:36+5:30

या कमाल अनुभवाबद्दल अभिनेत्री म्हणाली...

Esha Gupta only Bollywood actress was invited to EURO CUP 2024 witnessed Spain s victory | 'या' एकमेव बॉलिवूड अभिनेत्रीला EURO CUP 2024 चं होतं आमंत्रण, स्पेनचा विजय प्रत्यक्ष पाहिला

'या' एकमेव बॉलिवूड अभिनेत्रीला EURO CUP 2024 चं होतं आमंत्रण, स्पेनचा विजय प्रत्यक्ष पाहिला

१४ जुलै रोजी झालेल्या UEFA EURO CUP 2024 फायनलमध्ये स्पेनने इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या अंतिम सामन्यात संघाने २-१ असा विजय मिळवत नवा विक्रम रचला. स्पेनचा हा विजय एका बॉलिवूड अभिनेत्रीने प्रत्यक्ष पाहिला. केवळ तिलाच EURO CUP 2024 फायनलचं आमंत्रण मिळालं होतं. कोण आहे ती अभिनेत्री?

बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या प्रतिष्ठित UEFA EURO CUP 2024 फायनलमध्ये बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta)  सहभागी झाली होती. ईशाने अनेकदा फुटबॉल खेळाप्रती आपलं प्रेम दाखवलं आहे. बॉलिवूडमधून फक्त ईशालाच फायनलचं आमंत्रण देण्यात आलं होतं ही खूप मोठी गोष्ट आहे. याचा अनुभव सांगताना ईशा म्हणाली, "कमाल अनुभव. हा खेळ फॉलो करणाऱ्यांना किंवा आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना फायनलसाठी आमंत्रित करण्यात आलं याचा मला आनंद आहे. त्यांनी मला एक बॉलिवूड अभिनेत्री म्हणून बोलावलं असं तरी मला हा खेळ माहित आहे. त्यामुळे सर्व चाहत्यांमध्ये मी तिथे उपस्थित होते आणि सर्वांच्याच भावना तीव्र होत्या."

ती पुढे म्हणाली, "जगाला भारतीय सिनेइंडस्ट्रीबाबत कल्पना आहे हे खरोखरंच प्रशंसनीय आहे. तसंच त्यांनी मला आमंत्रित केलं यासाठूी मी आभारी आहे. तसंच मी फिल्म इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करत असतानाच फक्त सेलिब्रिटी म्हणून नाही तर एक फुटबॉल प्रेमी म्हणूनही तिथे होते. हे चांगलं रिप्रेझेंटेशन आहे आणि यामुळे आदरही मिळाला. तिथे मी अनेक दिग्गजांची भेटही घेतली. एकूणच कमाल अनुभव होता."

Web Title: Esha Gupta only Bollywood actress was invited to EURO CUP 2024 witnessed Spain s victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.