ईशा गुप्ताच्या बाथरूममधील बोल्ड सेल्फीने सोशल मीडियावर केला धमाका, फोटो झाला व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 12:46 PM2020-12-16T12:46:40+5:302020-12-16T12:49:16+5:30

ईशा गुप्ताचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती तिच्या बोल्ड अंदाजात दिसत आहे. यात ती बाथरूममध्ये मिररसमोर सेल्फी घेताना दिसत आहे.

Esha Gupta shared her hot bathroom Selfie photo viral on internet | ईशा गुप्ताच्या बाथरूममधील बोल्ड सेल्फीने सोशल मीडियावर केला धमाका, फोटो झाला व्हायरल...

ईशा गुप्ताच्या बाथरूममधील बोल्ड सेल्फीने सोशल मीडियावर केला धमाका, फोटो झाला व्हायरल...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या भलेही सिनेमांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांनाच हैराण करत असते. आपल्या फॅन्स मनात अजूनही ती घर करून आहे. सध्या ती तिच्या एका सेल्फीमुळे चर्चेत आहेत. हा सेल्फी तिने बाथरूममध्ये काढला आहे. 

ईशा गुप्ताचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती तिच्या बोल्ड अंदाजात दिसत आहे. यात ती बाथरूममध्ये मिररसमोर सेल्फी घेताना दिसत आहे. ईशा गुप्ता याआधी तिच्या टॉपलेस फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली होती. तिच्यावर अनेकांना टीकाही केली होती. पण नंतर तिने तिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले होते. 

ईशा गुप्ताने २००७ मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता आणि यात ती तिसऱ्या स्थानावर होती. तिने मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब आपल्या नावावर केला होता. त्यानंतर २०१० मध्ये ईशा गुप्ता फार बोल्ड फोटोंसोबत किंगफिशरच्या कॅलेंडरवर झळकली होती आणि येथूनच ती पुढे बॉलिवूडमध्ये आली.

ईशाने २०१२ मध्ये 'जन्नत २'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्याचवर्षी ईशा राज ३थ्रीडी आणि चक्रव्यूह सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती हमशकल्स रूस्तम, कमांडो २, बादशाहो पलटन, टोटल धमाल या सिनेमांमध्येही दिसली.

ई-टाइम्ससोबत बोलताना ईशा गुप्ताने ट्रोल्सबाबत काही सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, 'मला वाटतं की, जर लोक २०२० नंतरही निगेटीव्ह होण्यात आणि ट्रोल करण्यात व्यस्त आहेत तर त्यांना काही गंभीर समस्या होऊ शकते. मला कधी कधी वाईट वाटतं की, ते परेशान आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी कुणीच नाही आणि हेच कारण आहे ते दुसऱ्यांना ट्रोल करतात'.

Web Title: Esha Gupta shared her hot bathroom Selfie photo viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.