या अभिनेत्रीवर दिल्लीच्या उद्योगपतीने ठोकला मानहानीचा दावा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 11:27 AM2019-07-21T11:27:23+5:302019-07-21T11:28:16+5:30

आपल्या बोल्डनेस आणि बिनधास्तपणासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री सध्या एका वादात अडकली आहे.

esha gupta slapped with defamation suit by delhi hotelier for accusing him of sexual misconduct | या अभिनेत्रीवर दिल्लीच्या उद्योगपतीने ठोकला मानहानीचा दावा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

या अभिनेत्रीवर दिल्लीच्या उद्योगपतीने ठोकला मानहानीचा दावा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

googlenewsNext
ठळक मुद्देईशाला शिक्षा व्हावी आणि मला योग्य भरपाई मिळावी, असे या बिझनेसमॅनने म्हटले आहे.

आपल्या बोल्डनेस आणि बिनधास्तपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या एका वादात अडकली आहे. ईशाविरोधात एका व्यक्तीने मानहानीचा दावा ठोकला आहे. मानहानीचा दावा ठोकणारी ही व्यक्ती दिल्लीचा एक बिझनेसमॅन आहे.
  काही दिवसांपूर्वी ईशाने या बिझनेसमॅनवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून ईशाने आपबीती सांगितली होती. या पोस्टसोबत संबंधित बिझनेसमॅनचा फोटो आणि त्याचे नावही तिने जगजाहिर केले होते.



‘ त्याने ना मला काही म्हटले, ना मला स्पर्श केला. पण त्याची नजर बलात्कारापेक्षा कमी नव्हती. या देशात माझ्यासारखी एखादी महिला असुरक्षित असेल तर अन्य मुलींचे काय? माझ्यासोबत दोन सिक्युरिटी गार्ड असतानाही मला असा अनुभव आला.  त्याची नजर पाहून जणू तो माझ्यावर बलात्कार करतोय, असे वाटले,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले होते. या पोस्टनंतर अनेकांनी ईशाला पाठींबा दिला होता. पण याच पोस्टमध्ये उल्लेख असलेल्या बिझनेसमॅनने ईशावर मानहानीचा दावा ठोकला आहे.


ईशाच्या पोस्टनंतर मी स्वत: मानसिक तणावातून जातो आहे. तिच्या या कृत्यामुळे मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही टीका सहन करावी लागली. ईशाच्या पोस्टमध्ये काहीही सत्य नसताना लोकांनी ते खरे मानले. यासाठी ईशाला शिक्षा व्हावी आणि मला योग्य भरपाई मिळावी, असे या बिझनेसमॅनने म्हटले आहे.

Web Title: esha gupta slapped with defamation suit by delhi hotelier for accusing him of sexual misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.