तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना...; घटस्फोटानंतरही एकत्र दिसले आमिर खान आणि किरण राव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:36 PM2022-02-01T18:36:48+5:302022-02-01T18:37:11+5:30
आमिर खान (Aamir Khan)ने मागील वर्षी किरण राव(Kiran Rao)सोबत घटस्फोट घेत असल्याचे सांगितले तेव्हा अनेकांना धक्का बसला. अभिनेत्याचा हा दुसरा घटस्फोट होता. मात्र घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण एकमेकांपासून वेगळे होऊ शकलेले नाहीत.
आमिर खान (Aamir Khan)ने मागील वर्षी किरण राव (Kiran Rao)सोबत घटस्फोट घेत असल्याचे सांगितले तेव्हा अनेकांना धक्का बसला. अभिनेत्याचा हा दुसरा घटस्फोट होता. मात्र घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण एकमेकांपासून वेगळे होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ते बऱ्याचदा एकत्र दिसत आहेत. पुन्हा एकदा आमिर आणि किरण एकत्र दिसले. यादरम्यानही दोघांचे बाँडिंग खूपच मजबूत दिसत होते.
आमिर खान, बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या चित्रपटांपेक्षा तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिर खानने मागील वर्षी किरण रावसोबत घटस्फोट घेत असल्याचे सांगितले तेव्हा अनेकांना धक्का बसला. दोघांच्या अचानक घटस्फोटाच्या निर्णयामुळे सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण होत होते. मात्र घटस्फोटानंतरही आमिर त्याची माजी पत्नी किरण रावसोबत वेळ घालवताना दिसत आहे. नुकताच आमिर आणि किरणचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून चाहते विविध गोष्टींबद्दल बोलत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये किरण राव आणि आमिर खान एकत्र दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आमिर खान आणि किरण राव बोलताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांचे एक्सप्रेशन असे आहेत की, जणू ते दोघेही आजही रिलेशनशीपमध्ये आहेत.. या व्हिडिओवर कमेंट करत लोक विचारत आहेत की त्यांनी घटस्फोट का घेतला. आमिर खान आणि किरण राव यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला असला तरी ते नेहमीच एकमेकांसोबत काम करतील, असे वक्तव्य जारी केले होते. आणि दोघांची मैत्रीही कायम राहील. यापूर्वी आमिर खानही मुलगा आझादच्या वाढदिवसाला किरणसोबत होता. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.