रिलीजआधीच 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'ला मोठा फटका, या देशात आणली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:38 IST2024-10-31T13:37:18+5:302024-10-31T13:38:49+5:30
'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'चं रिलीजआधीच मोठं नुकसान होणार आहे. कारण समोर आलंय (singham again, bhool bhulaiyya 3)

रिलीजआधीच 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'ला मोठा फटका, या देशात आणली बंदी
सध्या बॉलिवूडमध्ये दोन सिनेमांची चर्चा चांगलीच सुरु आहे. हे सिनेमा म्हणजे 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'. या वर्षातील बहुचर्चित सिनेमे म्हणून 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' हे ओळखले जात आहेत. उद्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' हे सिनेमे रिलीज होणार आहेत. एकाच दिवशी या सिनेमांमध्ये कॉंटे की टक्कर बघायला मिळणार आहे. अशातच 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' सिनेमांना रिलीजआधीच मोठा फटका बसलाय.
'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' होणार नुकसान?
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या सिनेमांवर सौदी अरब देशामध्ये बंदी घालण्यात आलीय. 'भूल भूलैय्या ३' सिनेमात कार्तिक आर्यन जी भूमिका साकारतोय त्यात समलैंगिकतेचा उल्लेख आहे. तर 'सिंघम अगेन' सिनेमात हिंदू-मुस्लिम तणावाची झलक बघायला मिळतेय. या विषयांच्या पार्श्वभूमीवर 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या सिनेमांना सौदी अरबमध्ये बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे रिलीजआधीच या दोन सिनेमांना मोठा फटका बसणार आहे.
Advance booking as of now:#BhoolBhulaiyaa3 : 2.80 Crs#SinghamAgain : 1.75 Crs
— Pavan Khedkar (@khedkarpavan07) October 30, 2024
Singham Again is catching BB3 numbers after advance booking opened. May be it will overtake today EOD.#Singham3#BhoolBhulaiya3pic.twitter.com/uw1L55Expx
'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'ची उत्सुकता शिगेला
रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' सिनेमात अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांची भूमिका आहे. तर अक्षय कुमारचा कॅमिओ आहे. याशिवाय कार्तिक आर्यनच्या भूल भूलैय्या ३ मध्ये कार्तिकसोबत विद्या बालन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, विद्या बालन या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. हे दोन्ही सिनेमे उद्या १ नोव्हेंबरला रिलीज होणार आहेत.