"तेव्हाही मी रडलो नव्हतो...", रणबीरने सांगितलं ऋषी कपूर यांच्या निधनाच्या त्या रात्री काय घडलं होतं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 06:17 PM2024-07-27T18:17:29+5:302024-07-27T18:17:59+5:30
Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्यासोबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर त्याने वडील ऋषी कपूर यांच्यासोबतच्या अखेरच्या दिवसांबद्दल सांगितले.
अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ने २००७ साली बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सध्या रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्यासोबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर त्याने वडील ऋषी कपूर यांच्यासोबतच्या अखेरच्या दिवसांबद्दल सांगितले. रणबीरला तो दिवस आठवला जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये पॅनिक ॲटॅक आला होता जेव्हा त्याला सांगण्यात आले होते की ऋषी कपूर कधीही जाऊ शकतात. ऋषी कपूर यांचे एप्रिल २०२० मध्ये कर्करोगामुळे निधन झाले होते.
रणबीर कपूर म्हणाला, 'मी लवकरच रडणे बंद केले. पप्पांचं निधन झाले तेव्हाही मी रडलो नाही. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की ही त्यांची शेवटची रात्र आहे, ते लवकरच निघून जातील. मला आठवते की मी खोलीत गेलो आणि मला पॅनिक अटॅक आला. मला कसे व्यक्त करावे हेच कळत नव्हते. खूप काही घडत होतं जे मी सांभाळू शकत नव्हतो. पण त्यांच्या जाण्याचा मी शोक केला असे मला वाटत नाही. उलट माझ्या झालेल्या नुकसानाची जाणीव झाली.
तेव्हा मला आमच्यातलं अंतर जाणवलं
रणबीर आणि ऋषी यांचे संबंध चांगले नव्हते. पण आता तो म्हणतो की, तो अंतर पार करू शकलो नाही, याचा अपराधीपणा वाटतो. 'त्यांच्यावर उपचार सुरू असताना आम्ही न्यूयॉर्कमध्ये एक वर्ष एकत्र घालवले. याबाबत तो अनेकदा बोलला. मी तिथे ४५ दिवस राहिलो आणि एके दिवशी ते माझ्याजवळ आले आणि रडू लागले. त्यांना मी कधीच असे पाहिले नव्हते. हे माझ्यासाठी खूप त्रासदायक होते. त्यावेळी मी त्यांना सांभाळले पाहिजे होते किंवा मिठी मारली पाहिजे होते, पण मला ते कळत नव्हते. तेव्हा मला खरंच आमच्यातलं अंतर जाणवलं. आपल्यातील अंतर कमी करून त्यांना मिठी मारण्याचे धाडस माझ्यात नव्हते हे मला अपराधी वाटते. मी त्यांना थोडे प्रेम देऊ शकलो असतो.
आता तुम्ही एक जबाबदार व्यक्ती झाला आहात
रणबीर कपूर पुढे म्हणाला की, माणसाचे संगोपन एका खास पद्धतीने होते. 'जिथे तुम्हाला सांगितले जाते की तुम्ही आता एक जबाबदार व्यक्ती झाला आहात. मग त्याच गोष्टी मनात घुमू लागतात. मला आई, बहीण, पत्नी, एक मुलगी आहे आणि वडिलांचेही निधन झाले. आता इतक्या जबाबदाऱ्या असताना मी स्वतःला कमकुवत दाखवू शकतो का? हे सर्व कशाबद्दल आहे हे मला माहित नाही, परंतु मी माझी दुर्बलता दाखविली नाही. त्याचवेळी बहीण रिद्धिमाने सांगितले होते की, राजीव कपूर आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एका वर्षात विखुरलेले कुटुंब जवळ आले आणि प्रत्येकजण एकमेकांची अधिक काळजी घेऊ लागले आहेत.