स्मिता पाटीलविषयी एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाने केले मोठे वक्तव्य, वाचा काय म्हटले?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 02:07 PM2017-12-17T14:07:03+5:302017-12-17T19:37:03+5:30
स्मिता पाटील मेमोरियल पुरस्कार प्राप्त करणाºया अभिनेत्री रेखा या दिवंगत स्मिता पाटील यांना स्वत:पेक्षा उत्कृष्ट अभिनेत्री मानतात. रेखा यांना ...
स मिता पाटील मेमोरियल पुरस्कार प्राप्त करणाºया अभिनेत्री रेखा या दिवंगत स्मिता पाटील यांना स्वत:पेक्षा उत्कृष्ट अभिनेत्री मानतात. रेखा यांना गेल्या शनिवारी चित्रपटसृष्टीत विशेष योगदान देण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. रेखाने म्हटले की, ‘मला आनंद होत आहे की, स्मिताच्या नावाने मला पुरस्कार प्रदान केला जात आहे. मी तुम्हा सर्वांना हे सांगू इच्छिते की, तुम्ही मला पहिलाच स्मिता पाटील मेमोरियल पुरस्कार देऊन एक चांगला निर्णय घेतला. कारण मला असे वाटते की, हा पुरस्कारावर माझाच अधिकार आहे.
्नरेखा त्यांच्या या वाक्याचे स्पष्टीकरण देताना म्हणाल्या की, ‘हा पुरस्कार त्यांच्या (स्मिता पाटील) उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. ज्यामध्ये त्यांच्या अभिनय क्षमता, नृत्य क्षमता आणि कॅमेºयासमोर बिनधास्तपणे येण्याची क्षमता दर्शवितो. स्मिता बिनधास्तपणे आपले जीवन जगली. एक शब्दही न बोलता आपल्या सुंदर डोळ्यांनी सर्व काही सांगण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांच्या नावे मला पुरस्कार दिला गेल्याने मी त्यांचे गुण गात आहे, असे अजिबात नाही. तर त्या एक उत्कृष्ट आणि शानदार अभिनेत्री होत्या, असे मी मानते.
पुढे बोलताना रेखा म्हणाल्या की, मला याची जाणीव ३० वर्षांपूर्वी झाली होती. जेव्हा मी त्यांचे सर्व चित्रपट बघण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच मी आज जाहीरपणे सांगू शकते की, त्या माझ्या किंवा अन्य अभिनेत्रींच्या तुलनेत उत्कृष्ट आहेत. दरम्यान, जेव्हा स्मिता पाटील आणि रेखा फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह होत्या तेव्हा दोघींची अनेकदा तुलना केली जात असे. काही लोक रेखा यांना उत्कृष्ट अभिनेत्री समजायचे तर काही स्मिता पाटील यांना. असो, आता स्वत: रेखा यांनीच त्यांच्या तुलनेत स्मिता पाटील या अधिक उत्कृष्ट अभिनेत्री असल्याचे मान्य केल्याने ही चर्चा कदाचित संपेल, यात दुमत नाही.
दरम्यान, ज्या कार्यक्रमात रेखा यांना स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्ड देण्यात आला, त्या कार्यक्रमात अमृता सुभाष, प्रतीक बब्बर, आनंदजी वीरजी शाह उपस्थित होते.