एव्हरग्रीन ब्यूटी रेखाचा विनामेकअप फोटो पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, तुम्ही पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:51 IST2023-07-25T13:50:51+5:302023-07-25T13:51:55+5:30
नेहमी मेकअपमध्ये दिसणाऱ्याला रेखाला कधी विनामेकअप पाहिलंय का?

एव्हरग्रीन ब्यूटी रेखाचा विनामेकअप फोटो पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, तुम्ही पाहिलात का?
एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या (Rekha) सौंदर्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. आपल्या दिलखेचक अदांनी तिने आजच्या पिढीलाही भुरळ घातली आहे. कांजीवरम साडीत रेखाचा लुक सर्वांनाच प्रेमात पाडणारा असतो. कोणतंही अवॉर्ड फंक्शन रेखाशिवाय अपूर्णच असतं. रेखा बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्यूटी आहे. पण नेहमी मेकअपमध्ये दिसणाऱ्याला रेखाला कधी विनामेकअप पाहिलंय का?
कांजीवरम साडी, साजेसे दागिने, गजरा, टिकली, भांगेत सिंदूर अशा पारंपारिक लुकमध्येच रेखाला नेहमी पाहिलं गेलंय. आजपर्यंत रेखाचा विनामेकअप चेहरा समोर आलेला नव्हता. पण काही वर्षांपूर्वीचा रेखाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत अभिनेत्री कारमध्ये बसली आहे आणि तिने काहीच मेकअप केलेला दिसत नाही. केवळ थोडी लिपस्टिक लावलेली दिसते. या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
या व्हायरल फोटोत रेखाच्या चेहऱ्यावर डाग दिसत आहेत. तर हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. रेखाच्या मेकअप लुकसोबत या फोटोची तुलनी केली जातीए. मेकअप असो किंवा नसो रेखा सुंदरच दिसते अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्यात. काही दिवसांपासून रेखा महिला सेक्रेटरीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. मात्र या चर्चा सुरु होताच रेखाची बायोग्राफी लिहिणारे लेखक यासिर उस्मान यांनी त्यावर मौन सोडलं. या चर्चांवर आक्षेप घेत बायोग्राफीमध्ये असं काही लिहिलेलं नाही हे सगळं खोटं आहे असा खुलासा केला.