अमिताभ बच्चन यांच्या पार्टीत माधुरी दीक्षितचा बोल्ड ब्लाउज पाहून सगळे झाले होते हैराण, पाहा तो फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 08:00 AM2020-05-21T08:00:00+5:302020-05-21T08:00:00+5:30
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितची पन्नाशी उलटली असली तरी तिची स्टाईल व अदा आजही घायाळ करतात.
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितची पन्नाशी उलटली असली तरी तिची स्टाईल व अदा आजही घायाळ करतात. मग तिने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला असेल किंवा ट्रेडिशनल. प्रत्येक आऊटफिटमधील तिचा लूक वेगळाच असतो. ती फॅशनमध्ये लेटेस्ट स्टाईल करण्याला जास्त प्राधान्य देते. त्यात विशेष करून ती साडी परिधान करते त्यावेळी ती जास्त करून नेकलाइन आणि स्लीव्ज सिम्पल असेल असे ब्लाउज घालते. अशात जेव्हा तिने बोल्ड ब्लाउज परिधान केला तेव्हा सगळेच हैराण झाले होते.
हा किस्सा आहे मागील वर्षी दिवाळीतील. मागील वर्षी अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षित व तिचा नवरा श्रीराम नेनेदेखील आले होते. त्यावेळी माधुरीने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली साडी निवडली होती.
गोल्डन रंगाच्या साडीवर सीक्वेन्स वर्क करण्यात आले होते. जो या साडीला शाइनी लूक देत होता. पॅपाराजीच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश पडल्यावर ही साडी आणखीनच झगमगू लागली. त्यात धक धक गर्लच्या स्माईलने तिच्या सौंदर्याला चार चाँद लावले. माधुरीच्या या गोल्डन साडीसोबत तिच्या बोल्ड ब्लाउजनेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
साधारण स्लीव्जवाल्या ब्लाउजमध्ये दिसणाऱ्या माधुरी दीक्षितने गोल्डन साडीसोबत स्ट्रैप्ड ब्लाउज निवडला होता. ही स्ट्रीप्स स्पगेटीनुसार थोडी लांब होती. या गोल्डन ब्लाउजची डिझाईन ब्रा शेपमध्ये ठेवली होती. त्या ब्लाउजचे हुकदेखील तसेच होते. या साडीला मॅच करण्यासाठी ब्लाउजवर देखील गोल्डन सीक्वेन्स वर्क होते.माधुरीने ही साडी अशी नेसली होती की तिच्या या ब्लाउजवर कुणाचे लक्ष जाणार नाही. मात्र असे झाले नाही. तर याउलट सर्वांचे तिच्या ब्लाउजवर लक्ष गेले.
तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला. तिचा हा एक्सपेरिमेंट सगळ्यांना खूपच भावला. लोकांनी या फोटोवर एव्हरग्रीन ब्युटी अशी कमेंट केली.