दीपिका हीच माझी फर्स्ट चॉईस होती..., ‘गहराइयां’साठी शकुन बत्रांनी अशी फायनल केली स्टारकास्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:36 PM2022-02-22T12:36:33+5:302022-02-22T12:37:45+5:30

Gehraiyaan : ‘गहराइयां’ या दीपिका पादुकोणच्या चित्रपटाची चर्चा अजूनही सुरू आहे. काहींना हा सिनेमा आवडला, काहींनी त्यावर टीका केली. पण एक चांगला सिनेमा साकारण्याचा आनंद दिग्दर्शक शुकन बत्रा यांना नक्कीच आहे. चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

Exclusive INTERVIEW Deepika was my first choice Shakun Batra on Gehraiyaan | दीपिका हीच माझी फर्स्ट चॉईस होती..., ‘गहराइयां’साठी शकुन बत्रांनी अशी फायनल केली स्टारकास्ट

दीपिका हीच माझी फर्स्ट चॉईस होती..., ‘गहराइयां’साठी शकुन बत्रांनी अशी फायनल केली स्टारकास्ट

googlenewsNext

- मेहा शर्मा

‘गहराइयां’ (Gehraiyaan) या दीपिका पादुकोणच्या चित्रपटाची चर्चा अजूनही सुरू आहे. ओटीटीवर रिलीज झालेऱ्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या. काहींना हा सिनेमा आवडला, काहींनी त्यावर टीका केली. पण एक चांगला सिनेमा साकारण्याचा आनंद दिग्दर्शक शुकन बत्रा (Shakun Batra ) यांना नक्कीच आहे. चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...
 
तुम्ही ‘गहराइयां’चा विचार कसा केला?
शकुन बत्रा-  हा विचार काही काळ माझ्या मनात होता आणि तो फक्त मला एक्सप्लोर करायचा होता. ही प्रक्रिया इतर कोणत्याही चित्रपटापेक्षा वेगळी नव्हती, मी कथेवर विश्वास ठेवला आणि तो बनवला.

तुम्ही स्टार कास्ट कशी फायनल केली?
शकुन बत्रा- दीपिका ही माझी पहिली पसंती होती. मग मी सिद्धार्थ आणि अनन्याला भेटलो आणि सर्व काही ठरले.

आजच्या जगात नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत का?
शकुन बत्रा-आज ते गुंतागुंतीचे झाले आहेत असे म्हणणे योग्य नाही. डम आणि इव्ह यांच्या काळापासून हे संबंध गुंतागुंतीचे आहेत. देवदास, लम्हे, सिलसिला यांसारख्या गुंतागुंतीच्या कथा आपण खूप दिवसांपासून पाहत आहोत. आपल्याला अशा कथा कमी दिसतात; पण त्या आहेत. लम्हेबद्दल बोलायचे तर, कथा प्रगतिशील असल्याने ती त्या वेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकली नाही.


 
आज प्रेक्षक परिपक्व झाले आहेत का?
शकुन बत्रा-संपूर्ण समाजासाठी बोलणे माझ्यासाठी कठीण आहे, परंतु एक्सपोजरमुळे नक्कीच फरक पडला आहे. कथाकथनाची पद्धत विकसित झाली आहे. आज आपण लोकांना अस्वस्थ न करता अधिक बोल्ड कथा सांगू शकतो.

आपण आनंदी शेवट असलेले चित्रपट कमी पाहतो, असे का?
शकुन बत्रा-याआधीही ओपन एंडिंग कथा होत्या. ही निर्मात्याची निवड आहे, दोन्ही शेवट तितकेच मनोरंजक आहेत. आपण कोणत्या प्रकारची कथा सांगत आहात यावर ते अवलंबून आहे. काही कथांचा शेवट आनंदाने होतो आणि काही चित्रपटांचा शेवट उदास असतो. शेवट समाधानकारक असायला हवा, आनंदीच असेल असे नाही.

Web Title: Exclusive INTERVIEW Deepika was my first choice Shakun Batra on Gehraiyaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.