Exclusive : निमरत कौर ते 'दसवीं'मधली विमला देवी; ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, अभिनेत्रीने सांगितली इंटरेस्टिंग जर्नी

By तेजल गावडे | Published: April 7, 2022 06:21 PM2022-04-07T18:21:49+5:302022-04-07T18:22:16+5:30

लंचबॉक्स, एअरलिफ्ट चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री निमरत कौर (Nimrat Kaur) बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर 'दसवीं' (Dasvi) चित्रपटातून कॉमेडी करताना दिसणार आहे.

Exclusive: Nimrat Kaur to Vimala Devi from 'Dasvi'; You will be amazed to see the transformation, the actress said interesting journey | Exclusive : निमरत कौर ते 'दसवीं'मधली विमला देवी; ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, अभिनेत्रीने सांगितली इंटरेस्टिंग जर्नी

Exclusive : निमरत कौर ते 'दसवीं'मधली विमला देवी; ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, अभिनेत्रीने सांगितली इंटरेस्टिंग जर्नी

googlenewsNext

लंचबॉक्स, एअरलिफ्ट चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री निमरत कौर (Nimrat Kaur) बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दसवीं (Dasvi Movie) चित्रपटातून कॉमेडी करताना दिसणार आहे. दसवीं चित्रपटात तिने विमला देवीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

दसवींबद्दल...
दसवीं चित्रपटाची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. खूपच वेगळी स्टोरी आहे. यापूर्वी मी कधी अशी कथा ऐकलेली किंवा पाहिलेली नाही. तसेच मी साकारलेली विमला देवी हे पात्र देखील खूपच मनोरंजक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मला कॉमेडी रोलसाठी विचारण्यात आले. त्यामुळे मी या चित्रपटाच्या बाबतीत उत्साही आहे. तसेच निर्माते दिनेश विजान आणि दिग्दर्शक तुषार जलोटा .यांनी मला इतकी चांगली संधी दिली, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे.

कॉमेडी करणं वाटलं चॅलेंजिंग...
लोकांना हसविणं खूपच कठीण असते. तुम्हाला स्क्रीप्ट वाचताना हसू येते पण त्यावर सेटवर अॅक्ट करताना आपल्यासोबत लोकांनाही हसू आले पाहिजे हे सर्वात मोठं आव्हान कलाकारांसमोर असते. परिस्थिती वास्तविकही वाटली पाहिजे आणि त्यावर लोकांना हसू देखील आले पाहिजे. कॉमेडी करणं खूपच कठीण काम होते. त्यामुळे हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग होता.

 

भूमिकेची तयारी...
विमला देवी या भूमिकेची मी वेगळी तयारी केली नाही. मी पूर्णपणे स्क्रीप्टनुसार हे पात्र साकारले. बिमला देवी आणि माझ्यात काहीच साध्यर्म नव्हते. बिमला देवी गावातील एक साधी महिला आहे, जी नजर वर करूनही बोलत नाही. तिला कधीच शाळेत जायला मिळालं नाही आणि कधीच निर्णय घ्यायला मिळाला नाही. मात्र अचानक तिच्याकडे जेव्हा पॉवर येते तेव्हा तिला कळतं की मी आता काहीही करू शकते. या भूमिकेसाठी मी १५ किलो वजन वाढवले आणि हरयाणवी भाषेचे धडे गिरविले.

अभिषेक बच्चनबद्दल...
अभिषेक बच्चनसोबत काम करण्याचा खूपच चांगला आणि उत्साहपूर्ण अनुभव होता. एक कलाकार म्हणून ते जेवढे उत्तम आहेत तेवढेच ते माणूस म्हणून चांगले आहेत. सेटवर सगळ्यांची काळजी घ्यायचे. स्पॉट बॉयपासून दिग्दर्शकांपर्यंत सगळ्यांकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. त्यांच्यासोबत काम करायला खूप मज्जा आली. सेटवर त्यांच्यामुळे हसतेखेळते वातावरण होते. कुठेच त्यांनी स्टारडम दाखवला नाही.

अनुभव...
दसवीं चित्रपटाचा अनुभव खूपच अप्रतिम होता. मी अशाप्रकारच्या वेगळ्या भूमिकेच्या प्रतीक्षेत होते. जिथे काहीतरी मला वेगळे करायला मिळेल. मी विम्मोच्या गेटअपमध्ये आरशात पाहायचे तेव्हा मी स्वतःपेक्षा खूपच वेगळी दिसायचे. विमला देवी चौधरीचा प्रवास साकारायला मला खूप मजा आली. मला साचेबद्ध भूमिका करायचा कंटाळा आला होता. दसवींमुळे मला उत्तम संधी मिळाली. त्यासाठी दिनेश विजान आणि तुषार जलोटा यांचे खूप आभार मानते. या चित्रपटात माझी निवड त्यांनी केलेल्या कल्पनेमुळे झाली. त्यांना वाटले की या भूमिकेसाठी मी योग्य आहे. जेव्हा ते चित्रपटाची ऑफर फेब्रुवारी २०२० साली घेऊन आले. तेव्हाच मी त्यांना होकार दिला होता. पण त्यांचे माझ्या निवडीबाबत मत बदलू नये असे मला सारखे वाटत होते. २०२१मध्ये दिवाळीत जेव्हा चित्रपट फ्लोअरवर गेला तेव्हा मला कळलं की या भूमिकेसाठी वजन वाढवावे लागणार आहे. या चित्रपटासाठी मी ६ महिन्यात १५ किलो वजन वाढविले. त्यासाठी मी खूप खाल्ले. कधी कधी तर खावून खावून थकायचेदेखील. वजन वाढल्यानंतर कपडे होत नव्हते. चालताना, जिने चढताना-उतरताना श्वास फुलायचा. तीन दिवसांचे काम बाकी होते तेव्हा दुसऱ्यांदा लॉकडाउन झाले. मग तेव्हा मला वाढलेले वजन टिकून ठेवायचे होते. त्यामुळे हा खूप मोठा प्रवास होता. मग जेव्हा तीन दिवसांचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा वजन घटवायला सुरूवात केली.

वजन वाढवण्या आणि घटवण्याच्या प्रोसेसबद्दल...
वजन वाढविणेदेखील माझ्यासाठी सोप्पे नव्हते. कारण तुमचे शरीर नॅचरली एकाप्रकारचे आहे. वजन वाढवण्यासाठी मी कोणतेही हार्मोनल इंजेक्शन घेतले नाही. मी पदार्थ खाऊन वजन वाढविले आहे. खाऊन देखील माझे वजन वाढतच नव्हते. तीन महिन्यानंतर वजन वाढायला सुरूवात झाली. मग ते थांबायचे नाव घेत नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी वजन वाढवण्याची प्रोसेसदेखील सोप्पी नव्हती. शूटिंग संपल्यानंतर वजन घटवायला सुरूवात केली तेव्हा लॉकडाउन होते. त्यामुळे जिम बंद होते. तेव्हा मी माझ्या फ्रेंडसोबत वर्कआउट घरी करत होते. एक वर्षे शरीराला व्यायामाची सवय नव्हती. त्यानंतर खूप एक्सरसाइज केल्यामुळे मला टेनिस लेगची समस्या निर्माण झाली. एक महिना मला बेड रेस्ट करावा लागला. मग मी हळूहळू वजन घटविले. पण अजून मी मूळ साइजवर आलेले नाही. त्यामुळे अजूनही वजन घटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक कलाकार म्हणून हे चॅलेंज असते आणि मला असे चॅलेंज स्वीकारायला आवडते.
 

Web Title: Exclusive: Nimrat Kaur to Vimala Devi from 'Dasvi'; You will be amazed to see the transformation, the actress said interesting journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.