Exclusive ओल्ड मेलडिजला नवा तडका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2016 09:10 AM2016-07-23T09:10:48+5:302016-12-15T10:54:08+5:30

प्रियांका लोंढे                              ओठांवर गुणगुणत रहावी ...

Exclusive Old Melodie New Tadka | Exclusive ओल्ड मेलडिजला नवा तडका

Exclusive ओल्ड मेलडिजला नवा तडका

googlenewsNext
प्रियांका लोंढे

           
                 ओठांवर गुणगुणत रहावी अशी मेलडी साँग्ज पुर्वी चित्रपटांमध्ये असायची. परंतू आजच्या डीजेच्या जमान्यात मात्र बेबी को बेस पसंद है... असे सांगणाºया  गाण्यांनी धुमाकुळ जरी घातला असला तरी आजची तरुणाई काही या जुन्या मेलडीजला विसरलेली नाही. नव्वदच्या दशकातील हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर आजही बेधुंद डान्स केला जातो. गोविंदा-करिष्मा कपुर, माधुरी दिक्षित- अनिल कपुर, या जोड्यांची अफलातून गाणी आजही सुपरहिट आहेत. आता पुन्हा या जुन्या गाण्यांना नव्या रुपात चित्रपटांमध्ये पेश केले जात आहे. अशाच काही गाण्यांवर सीएनएक्सने टाकलेली ही नजर.....
         

     मला लागली कुणाची हिचकी :- पिंजरा या मराठी चित्रपटातील अजरामर गाणी कोणीच विसरु शकणार नाही. असेच या सिनेमातील एकदम भन्नाट मला लागली कुणाची उचकी हे फार गाजले होते. याच गाण्याची लाईन घेऊन फक्त शब्द बदलुन ते नव्या रुपात रिस्क या हिंदी चित्रपटात वापरण्यात आले. या गाण्याचे बोल अमिताभ वर्मा यांनी लिहिले होते तर गाणे सोनु कक्करने गायले होते. तनुश्री दत्ताने तिच्या लटक्या झटक्यांनी या गाण्याला चार चाँद लावण्याचे प्रयत्न केले. पण तरी देखील हे गाणे तरुणांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. 

 मेहबुबा ओ मेहबुबा : शोले चित्रपटातील मेहबुबा ओ मेहबुबा या गाण्यातील हेलनच्या अदांवर अन लटक्या-झटक्यांवर फिदा झालेले प्रेक्षक आजही हे गाणे लागले की हेलनलाच इमॅजिन करतात. त्याकाळी सुपर-डुपर हिट झालेले हे गाणे राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या राम गोपाल वर्मा की आग या चित्रपटात पुन्हा नव्या ढंगात आणले. उर्मिला मातोंडकरने या गाण्यात ठुमके लगावले असुन सुनिधी चौहानने आशाजींची कमी भरुन काढण्याचा पुर्णपणे प्रयत्न केला. पण हे नव्या प्रकारचे गाणे पे्रक्षकांच्या काही पचनी पडले नाही. 

 धीरे धीरेसे मेरी जिंदगी मै आना : आशिकी या चित्रपटातील गाणी त्याकाळी खुपच गाजली अन फक्त गाण्यांमुळेच हा चित्रपट चालला असेही बोलले गेले.  कुमार सानु यांनी गायलेले धीरे धीरे से मेरी जिंदगीमे आना हे गाणे आजही तरुणांच्या ओठी ऐकायला मिळते. नूकताच ऋतिक रोशन अन सोनम कपुर यांचा हे गाणे असलेला अल्बम प्रदर्शित झाला आणि या गाण्याची डिमांड वाढली. या नव्या गाण्याची भुरळ युथला अशी पडली की हे गाणे बºयाचजणांच्या मोबाईलची रिंगटोन म्हणुन वाजु लागले. 

             

 कहते है मुझको, हवा... हवाई : मिस्टर इंडिया या चित्रपटातील श्रीदेवीचे हवा हवाई हे गाणे ऐवढे हिट झाले होते की या गाण्यानंतर श्रीदेवीची हवा हवाई म्हणुनच सगळीकडे नवी ओळख झाली. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या शैतान या चित्रपटात हे गाणे सुमन श्रीधर यांनी डिफरंट स्वरुपात गायले. पण म्हणतात ना जुनं ते सोनं तसच काही झाल अन प्रेक्षकांनी आपल्या ओल्ड हवा हवाईलाच थम्स अप दिले.

 हर किसीको नही मिलता यहाँ प्यार जिंदही मैं : जाबाज या चित्रपटातील  हर किसीको नही मिलता यहाँ प्यार जिंदही मै या गाण्यात व्हाईट रंगाच्या साडीतील श्रीदेवी अप्रतिम दिसते. आता जवळपास २८ वर्षांनंतर हे गाणे पुन्हा बॉस या चित्रपटात अक्षय कुमार अन सोनाक्षी सिन्हा यांच्यावर चित्रीत करण्यात आले. सध्याचा सुपरस्टार सिंगर अरजित सिंग व नीती मोहन यांनी आपल्या आवाजाने या गाण्याला वेगळ््याच उंचीवर नेले आहे, तर सोनाक्षी देखील आपल्याला या गाण्यात स्टनिंग लुकमध्ये पहायला मिळते. 



  रेशम का रुमाल : ईला अरुण यांच्या आवाजातील रेशम का रुमाल हे गाणे ऐकतानाच भारदस्त अन वेगळे वाटते. आवाजातील ट्युनिंग अन ठसकेबाजपणामुळे या गाण्याला एक वेगळाच बाज चढला होता. आता हे गाणे ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटात उर्वशी रोतेला हिच्या बोल्ड अंदाजात पुन्हा एकदा समोर आले आहे. 

            

  काला चष्मा : अमर अरसी यांच्या पंजाबी अल्बम मधील काला चष्मा हे गाणे भलतेच हिट झाले अन तरुणांनी या गाण्यावर ठेका धरला. या गाण्याची ही लोकप्रियता अन युथच्या रिस्पॉन्सला  पाहता बार बार देखो या आगामी चित्रपटात हे गाणे पुन्हा घेण्यात आले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याची झलक नूकतीच दाखविण्यात आली. देसी लुक मधील सिध-कॅटने डोळ््यावर चढवलेला काळा चष्मा पाहुन हे गाणे नक्कीच युथला अ‍ॅट्रॅक्ट करेल असेच वाटतेय. 
 

Web Title: Exclusive Old Melodie New Tadka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.