Exclusive : संजय दत्त खऱ्या आयुष्यातही रिमा लागू यांची खऱ्या आईप्रमाणे घ्यायचा काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 09:32 AM2017-05-18T09:32:03+5:302017-05-18T18:24:42+5:30

वास्तव या चित्रपटात संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत आपल्याला रिमा लागू यांना पाहायला मिळाले होते. रिमा लागू यांनी या चित्रपटात ...

Exclusive: Sanjay Dutt is also worried about real life as Rima is a true mother | Exclusive : संजय दत्त खऱ्या आयुष्यातही रिमा लागू यांची खऱ्या आईप्रमाणे घ्यायचा काळजी

Exclusive : संजय दत्त खऱ्या आयुष्यातही रिमा लागू यांची खऱ्या आईप्रमाणे घ्यायचा काळजी

googlenewsNext
स्तव या चित्रपटात संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत आपल्याला रिमा लागू यांना पाहायला मिळाले होते. रिमा लागू यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका खूपच गाजली होती. या चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये आपल्याला रिमा लागू आणि संजय दत्त एकत्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांची एकमेकांसोबत चांगली गट्टी जमली होती. संजय दत्त हा त्याच्या खऱ्या आयुष्यात अतिशय चांगला असल्याचे रिमा लागू यांचे म्हणणे होते. 
रिमा लागू यांनी काही महिन्यांपूर्वी लोकमतच्या ऑफिसला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी वास्तव या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेचा एक किस्सा आवर्जून सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, वास्तव या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही अनेक खऱ्या लोकेशन्सवर जाऊन देखील चित्रीकरण करत असू. लोकांमध्ये जाऊन चित्रीकरण करणे हे कधीही कठीण असते. आम्ही चित्रीकरण करत असताना चित्रीकरण पाहाण्यासाठी जमलेल्या एका व्यक्तीने माझ्या बाबत अतिशय वाईट कमेंट केली. खरे तर ती कमेंट मी देखील ऐकली होती. पण त्यावर मी गप्प राहाणेच पसंत केले होते. पण संजयने कमेंट ऐकल्यावर तो अतिशय चिडला होता आणि त्याने त्या व्यक्तिला चांगलेच सुनावले होते. एका स्त्रीचा आदर केला पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. या चित्रपटात मी त्याच्या आईच्या भूमिकेत होते. आपल्या आईला कोणी काही बोलले तर आपण ज्याप्रकारे चिडतो, तितकाच राग त्याला मला कोणी बोलले म्हणून आला होता. त्यावरून तो एक माणूस म्हणूनही किती चांगला आहे याची मला जाणीव झाली होती. 

Web Title: Exclusive: Sanjay Dutt is also worried about real life as Rima is a true mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.