​अक्षयचे अनोखे मार्शल आर्ट सेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 03:16 PM2016-04-27T15:16:00+5:302016-04-27T20:46:00+5:30

अक्षयने हैदराबाद येथे नव आयपीएस अधिकाºयांसोबत संपूर्ण एक दिवस घालविला. 

Exhibit Unique Martial Art Session | ​अक्षयचे अनोखे मार्शल आर्ट सेशन

​अक्षयचे अनोखे मार्शल आर्ट सेशन

googlenewsNext
लाडी अक्षय कुमार त्याच्या लाजवाब मार्शल आर्ट कौशल्यासाठी ओळखला जातो. एकदम फिट अँड फाईन अक्षय स्वत:चे स्टंट स्वत: करतो. तसे पाहिले तर बॉलिवूडमध्ये मार्शल आर्ट प्रसिद्ध करण्याचे सर्व श्रेय अक्षयला जाते. त्याने ट्विटरवर एक स्पेशल व्हिडिओ पोस्ट करून मार्शल आर्ट स्कील दाखविले आहे.

अक्षयने हैदराबाद येथे नव आयपीएस अधिकाºयांसोबत संपूर्ण एक दिवस घालविला. दिवसभरात अक्षयने त्यांच्याशी गप्पा मारल्या, व्हॉलीबॉल खेळला आणि दिवसा अखेर एका अधिकाºयासोबत मार्शल आर्ट फाईट  केली. अक्षयचा जबरदस्त चपळता, पदलालित्य पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.

आपल्या ‘खिलाडी’ इमेजला शोभणारा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते नक्कीच खूश होतील यात काही शंकाच नाही. अक्षय सध्या आगामी चित्रपट ‘रुस्तुम’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच ‘हाऊसफुल ३’मधून तो सर्वांना पुन्हा एकदा हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. 
{{{{twitter_video_id####}}}}

Web Title: Exhibit Unique Martial Art Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.