बाबो..! आलिया भटने रणबीर कपूरला दिलं हे महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण
By तेजल गावडे | Updated: October 10, 2020 18:34 IST2020-10-10T18:32:17+5:302020-10-10T18:34:06+5:30
म्हणे, रणबीर कपूरला त्याच्या वाढदिवसाला आलिया भटने महागडी भेटवस्तू दिली आहे. ज्याची किंमत वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बाबो..! आलिया भटने रणबीर कपूरला दिलं हे महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी आलिया भट त्याच्या कुटुंबासोबत उपस्थित होती. नुकताच रणबीर आपल्या नव्या सायकलसोबत स्पॉट झाला. नवीन सायकलसोबतचा रणबीरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
असे म्हटले जात आहे की रणबीरची ही नवीन सायकल आलियाने वाढदिवसाला भेट म्हणून दिली आहे. या सायकलची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सायकलची किंमत १.५ लाख रुपये आहे.
नुकताच नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्या कोरियोग्राफरसोबत घाघरा गाण्यावर डान्स करताना दिसल्या. नीतू यांचा डान्स चाहत्यांना खूप भावला. मात्र चाहत्यांना अनेक प्रश्नदेखील पडले. चाहते विचारत आहेत की त्या रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तयारी करत आहेत का?
रणबीरसोबतच्या रिलेशनशीपबद्दल आलिया भट म्हणाली की....
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आलिया भटने सांगितले होते की, ती रणबीरसोबतच्या नात्याकडे फ्रेंडशीपच्या रुपात पाहणे पसंत करते. हे एक नाते नाही. ही एक मैत्री आहे. ही बाब मी पूर्ण प्रामाणिकपणे सांगते आहे. हे सुंदर आहे. सर्वात चांगली गोष्ट ही आहे की आम्ही दोन व्यक्ती आहोत जे आता आपापले जीवन जगत आहे. ही अशी स्थिती नाही जिथे तुम्ही आम्हाला सतत एकत्र पहाल. ही एक कम्फर्टेबल नात्याची खरी निशाणी आहे. नजर न लागो. वास्तविकतेत रणबीर माझा चांगला मित्र आहे.
आलिया भट आणि रणबीर कपूर ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.