चित्रपटाची भव्यता चित्रपटगृहातच अनुभवा! - राकेश ओमप्रकाश मेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2016 10:58 AM2016-10-10T10:58:22+5:302016-10-10T16:28:22+5:30

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला मिर्झिया हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण प्रदर्शनानंतर तीनच दिवसांत हा चित्रपट ...

Experience the magnificence of the movie theater! - Rakesh Om Prakash Mehra | चित्रपटाची भव्यता चित्रपटगृहातच अनुभवा! - राकेश ओमप्रकाश मेहरा

चित्रपटाची भव्यता चित्रपटगृहातच अनुभवा! - राकेश ओमप्रकाश मेहरा

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला मिर्झिया हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण प्रदर्शनानंतर तीनच दिवसांत हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला. चित्रपट लीक होणे ही बॉलिवुडची सध्या मोठी समस्या बनली आहे. याबाबत राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मांडलेले आपले मत...
 
चित्रपट ऑनलाइक लीक होणे हे आपल्या फिल्म इंडस्ट्रीसाठी नवीन नाही. मिर्झिया हा चित्रपटही एका वेबसाईटवर नुकताच लीक झाला. मिर्झिया बनवण्यासाठी गेली कित्येक वर्षं मी मेहनत घेत आहे. त्यामुळे ही गोष्ट कळ्यावर मला प्रचंड धक्काच बसला होता. माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला फोन करून, मेसेज करून हे कळवले आणि लगेचच मी त्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर चित्रपट वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला. पण दोन तास तरी हा चित्रपट त्या वेबसाईटवर होता. त्या दरम्यान जवळजवळ 10 लाख लोकांनी हा चित्रपट डाऊनलोड केला. चित्रपट बनवताना अनेक जण मेहनत करतात. अशाप्रकारे चित्रपट लीक करून कोणाला आनंद मिळतो हा मला नेहमीच प्रश्न पडतो. चित्रपटक्षेत्राशी किंवा चित्रपटांशी काहीही संबंध नसलेल्या लोकांचाच यामध्ये समावेश असतो असे मला अनेकवेळा वाटते. मलेशिया, पाकिस्तान किंवा भारतातील छोट्या राज्यातून चित्रपट लीक होत असल्याचे अनेकवेळा ऐकावयास मिळते. खरे तर मिर्झिया हा चित्रपट  चित्रपटगृहात पाहाण्यात एक वेगळी मजा आहे. चित्रपटगृहात गेल्याशिवाय या चित्रपटाची भव्यता तुम्हाला अनुभवता येणार नाही. त्यामुळे हा चित्रपट लोकांनी चित्रपटगृहातच पाहावा असे मी त्यांना आवाहन करेन.
मिर्झिया हा चित्रपट माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण मी व्ही. शांताराम यांना मी माझा गुरू मानतो. त्यांची कथा सांगण्याची पद्धत ही खूप वेगळी होती. त्यांच्या चित्रपटात गीत, संगीत हे कथा, कलाकार यांच्याइतकेच महत्त्वाचे असायचे. आपणही एखादा म्युझिकल चित्रपट बनवावा असे कित्येक दिवसांपासून माझ्या डोक्यात सुरू होते. भाग मिल्खा भागसारखा बायोपिक बनवल्यानंतर एखादा म्युझिकल चित्रपट करावा असे वाटत असल्यानेच एक वेगळ्या पठडीतला चित्रपट मी बनवला. मिर्झिया या चित्रपटातही चित्रपटाच्या कथेइतकेच संगीताला महत्त्व देण्यात आले आहे. मिर्झिया या चित्रपटाला सध्या चांगल्या, वाईट दोन्ही प्रतिक्रिया मिळत आहेत. पण मी स्वतः या चित्रपटाच्या निर्मितीच्याबाबतीत प्रचंड खूश आहे. सैय्यमी खेर आणि हर्षवर्धन कपूर या दोन्ही नवोदित कलाकारांनी खूप चांगले काम केले आहे आणि त्यांच्या अभिनयासाठी सगळेच त्यांचे कौतुक करत आहेत. या दोन्ही मुलांचा मला आज अतिशय अभिमान वाटत आहे. भाग मिल्खा भाग या चित्रपटाच्यावेळी फरहान अख्तरने जितकी मेहनत घेतली होती. तितकीच मेहनत हर्षवर्धनने या चित्रपटासाठी घेतली आहे हे मी आवर्जुन सांगेन. 
जगभरात अनेक चांगले चित्रपट बनवले जात आहेत. या चित्रपटांकडून आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे. त्यामुळे मी चित्रपट बनवताना या चित्रपटांकडून नक्कीच प्रेरणा घेतो. मिर्झियाचे सध्या वेगवेगळ्या देशातील फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग होत आहे. सगळीकडे खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. मी नुकताच लंडनमधून परतलो आहे आणि आता बुसानला जाणार आहे. तेथील बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. त्यानंतर मी स्क्रिनिंगसाठी शिकागोला रवाना होणार आहे. 

Web Title: Experience the magnificence of the movie theater! - Rakesh Om Prakash Mehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.