प्रयोगशील आर. बल्की
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2016 12:50 AM2016-04-02T00:50:42+5:302016-04-01T17:50:42+5:30
I don't believe borrowing things from real life. I think films should also add something to life हे शब्द आहेत ...
‘मुद्रा’ने दाखवली यशाची वाट
फिल्म मेकिंगचा किडा बल्की यांच्या डोक्यात वळवळत होताच. त्यामुळेच कॉलेजनंतर मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दिग्दर्शनाचा कोर्स करण्याचे त्यांनी ठरवले. पण त्यांची मुलाखत घेणारे पॅनल न आवडल्याने बल्कींनी स्वत:च ‘वाक आऊट’ करीत, या इस्टिट्यूटला बाय बाय केले. यानंतर त्यांनी काय करावे तर चक्क कॉम्प्यूटर अप्लिकेशन कोर्समध्ये प्रवेश घेतला. पण तिसºया वर्षाला कमी हजेरीमुळे त्यांना या कोर्समधून बाहेर फेकण्यात आले. याच काळात क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींनी बल्कींना अक्षरश: झपाटले होते. पण एकेदिवशी पेपरमध्ये ‘मुद्रा’या जाहिरात एजन्सीची जाहिरात बघितली आणि बल्कींना नवी वाट गवसली. ‘दाग अच्छे है’(सर्फ एक्सेल), ‘जागो रे (टाटा टी)’, ‘वॉक व्हेन यू टॉक’(आयडिया सेल्युलर) अशा अनेक जाहिरातीच्या कल्पना बल्की यांच्या डोक्यातून आल्या. २००७ मध्ये बल्कींनी स्वत:च ‘चीनी कम’ची कथा लिहिली, ते डायरेक्शनमध्ये उतरले आणि बॉलिवूडला ‘पा’, ‘इंग्लिश विंग्लीश’,‘शमिताभ’ आणि आता ‘की अॅण्ड का’सारख्या अप्रतिम चित्रकृती मिळाल्या.
‘की अॅण्ड का’
आर. बल्की यांचा हा नवा प्रयोग भन्नाट गाजतोय. याला दोन कारण आहेत. एक तर नायक-नायिका म्हणून त्यांनी अर्जुन-करिनाची अतिशय विसंगत जोडी निवडली आहे आणि दुसरे कारण म्हणजे भारतातील पुरुष प्रधान समाजाला कधीही पचनी न पडलेल्या विषयावर त्यांनी हा चित्रपट बनविण्याचे धाडस केले आहे. ‘की अॅण्ड का’मध्ये करिना अतिशय बोल्ड आणि फ्यूचर अॅम्बिशियस आहे तर अर्जुन हा तिच्यासाठी तिचा नवरा न बनता बायको बनण्यास जास्त उत्सुक असल्याचे व स्वयंपाकापासून कपडे धुण्यापर्यंत सर्व कामे करीत असल्याचे दाखवले आहे. या चित्रपटाची कथा फारच वेगळी आहे आणि आर. बल्कीच्या परिसस्पर्शाने त्या कथेचे सोने झाले आहे.
‘चीनी कम’
लंडनच्या रिमझिमत्या पावसात चित्रीत करण्यात आलेला हा चित्रपट समीक्षकांना प्रचंड आवडला. याचे श्रेय निश्चितच आर. बल्कीला आहे. ‘चीनी कम’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ६४ वर्षांचा पुरुष ३४ वर्षीय महिलेच्या प्रेमात पडतो आणि त्याचे जगच बदलते...या कथानकात बल्कींनी अमिताभ आणि तब्बू ही जोडी फिट बसवली आणि एका वेगळ्या प्रकृतीचा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळाला.
‘पा’
हा तर आर. बल्कींची अजरामर चित्रकृती ठरावी असा सिनेमा आहे. प्रोजेरिया या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाची कथा बल्की यांनी ‘पा’मध्ये दाखवली. साठी ओलांडलेल्या अमिताभ यांच्याकडून बल्की यांनी १२ वर्षांच्या ‘ओरो’ नामक बालकाची भूमिका अतिशय प्रभावी पद्धतीने वठवून घेतली. या चित्रपटाने कुठल्याही परिस्थितीत आनंदाने जगण्याचा मूलमंत्र प्रेक्षकांना दिला.
‘इंग्लिश विंग्लीश’
‘इंग्लिश विंग्लीश’च्या निमित्ताने बल्की यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. हा चित्रपट बल्की यांच्या पत्नी गौरी शिंदे यांनी दिग्दर्शित केला. गौरीही नवºयासारखीच गुणी आहे. या चित्रपटाचा विषयही विचार करायला भाग पाडणारा होता. हाऊस वाईफकडे बघण्याचा अनेक नवºयांचा दृष्टिकोन फारच संकुचित असतो. हिला काहीच कळत नाही, अशी त्यांची पक्की धारणा झालेली असते. याच धारणेला तडा देण्याचे काम या चित्रपटाने केले.
‘शमिताभ’
बल्की यांच्या प्रत्येक सिनेमाची प्रकृती वेगळी असते. मानवी नातेसंबंधांचे सूक्ष्म पदर उलगडून दाखविताना बल्की चित्रपटास एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. ‘शमिताभ’ यापैकी एक चित्रपट. यातही बल्की यांचा आवडता स्टार अर्थात अमिताभ यांना बल्की यांनी पडद्यावर आणले. मानवी अहंकाराचे सूक्ष्म पदर यात उलगडून दाखवले. नातेसंबंधातील द्वंद्व मांडणारा या सिनेमातही आर. बल्कींच्या दिग्दर्शनाची प्रतिभा पडदाभर जाणवत राहते.