सिनेमातूनही ‘नापाक’ चेहरा उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2016 02:34 PM2016-09-29T14:34:45+5:302016-09-29T21:28:54+5:30
सतीश डोंगरे भारत-पाक शांतता करारावर कधीही एकमत झाले नसल्याने त्याचे पडसाद वेळोवेळी बॉलिवूडमध्ये उमटले आहेत. वास्तवात भारतासमोर कधीही निभाव ...
स ीश डोंगरे
भारत-पाक शांतता करारावर कधीही एकमत झाले नसल्याने त्याचे पडसाद वेळोवेळी बॉलिवूडमध्ये उमटले आहेत. वास्तवात भारतासमोर कधीही निभाव न लागलेल्या पाकचा सिनेमांमधूनदेखील फज्जा उडविण्यात आला आहे. भारतीय सैन्यांची शौर्यगाथा दाखविताना पाकिस्तानचा नापाक चेहरा तर उघड केलाच शिवाय भारतीय सैन्यांची ताकददेखील यानिमित्त अधोरेखित केली. याची प्रचिती एलओसी ओलांडून भारतीय सैन्याने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यावरून आलीच. शिवाय सैन्यांनी पाकला दिलेल्या या सडेतोड उत्तरामुळे देशभरात त्यांच्या शौर्याचे कौतुकदेखील केले जात आहे. तसेच त्या चित्रपटांचीदेखील आठवण होत आहे, ज्यामध्ये भारतीय सैन्यांची शौर्यगाथा दाखविण्यात आली आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा...
बॉर्डर (१९९७)
भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असलेल्या ‘बॉर्डर’ या चित्रपटात भारतीय लष्कराचे सामर्थ्य दाखविताना पाकचा नापाक चेहरादेखील उघड केला आहे. राजस्थानातील लौंगेवाळा पोस्ट येथे झालेल्या लढाईचा प्रसंग यामध्ये दाखविण्यात आला असून, सत्यघटनेवर आधारित असल्याने कुरापतीखोर पाकला चित्रपटातून चांगलीच चपराक लगावली आहे. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन जेपी दत्ता यांनी केले आहे.
एलओसी कारगिल (२००३)
दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी पुन्हा ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटातून भारतीय सैन्याची शौर्यगाथा प्रेक्षकांपर्यंत पोहचविली. संजय दत्त, अजय देवगण, सैफ अली खान यांच्यासह डझनभर स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटातून पाकिस्तानी सैन्याला नेस्तानाबुत केल्याचे दाखविले. तब्बल चार तासांच्या या चित्रपटात तुफान युद्धानंतर भारतीय सैन्यांचा विजय अंगावर शहारे निर्माण करतो.
लक्ष्य (२००४)
१९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धावर आधारित असलेल्या ‘लक्ष्य’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. फरहान अख्तर, ऋतिक रोशन, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन, ओम पुरी, बोमन इराणी यांची प्रमुख भूमिका आहे. कारगिल युद्धाला पाकला कशा पद्धतीने भारतीय सैन्यांनी धूळ चारली हे चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
१९७१ (२००७)
मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘१९७१’ या सिनेमा भारत-पाक युद्धावर आधारित होता. चित्रपटातून पाकचे कपटी धोरण उघड केले होते. त्यामुळे या चित्रपटावर पाकिस्तानात बॅन लावण्यात आला होता.
हिंदुस्तान की कसम (१९७३)
दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या ‘हिंदुस्तान की कसम’ हा चित्रपट त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता. १९७१ मध्ये घेतलेल्या भारत-पाक युद्धावर आधारित असलेल्या या चित्रपटात ‘आॅपरेशन कॅक्टस लिली’ विषयीचे प्रसंग अतिशय खुबीने दाखविण्यात आले होते. या आॅपरेशनच्या माध्यमातून पाकचा धुर्त चेहरा जगासमोर मांडला होता.
मॉँ तुझे सलाम (२००२)
दिग्दर्शक टिनू वर्मा यांच्या ‘मॉँ तुझे सलाम’ या चित्रपटाने तर भारतीय देशभक्ती निर्माण केली होती. सनी देओल, तब्बू, अरबाज खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून पाकला एकप्रकारचा संदेश दिला होता. चित्रपटातील डायलॉग चांगलेच हिट झाले आहेत.
द अटॅक्स आॅफ २६/११ (२००८)
मुंबई हल्ल्यावर आधारित असलेल्या ‘द अटॅक्स आॅफ २६/११’ या चित्रपटाचे डायरेक्शन खूपच बारकाईने केले गेले. कारण पाकिस्तानने नेहमीच कांगावा करत स्वत:ला मुंबई हल्ल्यांपासून दूर ठेवले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजवर बंदीदेखील घालण्यात आली होती.
बेबी (२०१५)
मुंबई हल्ल्यातील मास्टर मार्इंड असलेल्या हाफिज सईदला पाकिस्तानने नेहमीच पाठीशी घातले आहे. मुंबई हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे भारताने पाकला पुरावे दिल्यानंतरही त्यांनी हाफिजला भारताच्या ताब्यात दिले नाही. हीच कथा ‘बेबी’ या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे.
गदर-एक प्रेम कहानी (२००१)
भारत-पाक फाळणीच्या वेळेस झालेल्या तुफान लढाईचा प्रसंग ‘गदर-एक प्रेम कहानी’ या चित्रपटातून दाखविण्यात आला आहे. सनी देओल, अमिषा पटेल, अमरिश पुरी यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट वादाच्या भोवºयात अडकला होता. मात्र तरीदेखील शंभर कोटींच्या क्लबमध्ये चित्रपटाने झेप घेतली होती.