फेसबुकवर चित्रपट पहा अन् कोरोनाग्रस्तांना करा मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 06:02 PM2020-05-15T18:02:42+5:302020-05-15T18:06:56+5:30

अभिनेते अनिल कपूर यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.

Facebook to livestream movies along with Lionsgate India TJL | फेसबुकवर चित्रपट पहा अन् कोरोनाग्रस्तांना करा मदत

फेसबुकवर चित्रपट पहा अन् कोरोनाग्रस्तांना करा मदत

googlenewsNext

‘लायन्स गेट लाईव्ह ! अ नाईट एट मुव्हीज’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून लायन्सगेट इंडिया यांनी अलिकडेच एक अनोखा उपक्रम जाहीर केला आहे. यानुसार फेसबुकच्या सहकार्याने चित्रपटांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करत निधी उभारून कोविड प्रभावितांना मदत करणार आहेत. यासाठी अभिनेते अनिल कपूर यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.
 
या उपक्रमाची माहिती देणारा एक व्हिडिओ अनिल कपूर यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यातून ते सिनेप्रेमीना १५ मे रोजी या उपक्रमांतर्गत दाखवल्या जाणाऱ्या Now you see me 2 बघण्याची विनंती करत आहेत. हा सिनेमा लायन्स गेट यांच्या फेसबुक पेजवरून शुक्रवार, १५ मे  रोजी रात्री ८ वाजता प्रक्षेपित केला जाईल.


लायन्स गेटच्या या अनोख्या उपक्रमाने अमेरिका आणि इंग्लडमध्ये हॉलिवूड सिनेमांच्या माध्यमातून निधी गोळा केला आहे. यासाठी त्यांना विविध कलाकारांनी सहकार्य केले आहे. यात प्रामुख्याने किनु रिविज, कियारा नाईटली यांचा विशेष समावेश आहे. ‘द सोशल नेटवर्क’फेम जेसी इजनबर्गनेसुद्धा ‘लायन्स गेट इंडिया’साठी एक विशेष व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या माध्यमातून सिनेरसिकांना त्यांचे आवडते चित्रपट बघत डोनेशन करण्याची संधी आहे. लायन्स गेट यांच्या पेज वरून हे डोनेशन करता येईल. या उपक्रमात अनिल कपूर यांच्यासह सन्या मल्होत्रा, अनन्या पांडे हे देखील सहभागी होत सदर उपक्रमाला मदत करत आहेत.
 ‘हा उपक्रम म्हणजे लॉकडाऊन पाळत घरी मनोरंजन करून घेण्याचा आणि त्याचवेळी सामजिक कार्यात हातभार लावण्याची उत्तम संधी आहे ‘अशी प्रतिक्रिया फेसबुक पार्टनरचे हेड मनीष चोप्रा यांनी दिली. दरम्यान, नजीकच्या काळात असे अजून काही चित्रपट अशाचपद्धतीने प्रदर्शित करणार असून, यात ‘द हंगर’ आणि ‘वंडर’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे
 

Web Title: Facebook to livestream movies along with Lionsgate India TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.