​‘पद्मावत’ रिलीज झाला तर फेसबुक लाईव्हवर आत्मदहन करेल! काहीच क्षणात व्हिडिओ व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 07:32 AM2018-01-21T07:32:32+5:302018-01-21T13:02:32+5:30

सर्वोच्च न्यायालय आणि सेन्सॉर बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतरही ‘पद्मावत’ला होत असलेला विरोध थांबलेला नाही. उलट राजपूत करणी सेनेने आपला विरोध आणखी तीव्र केला आहे. इतके कमी की काय म्हणून एका व्यक्तिने या चित्रपटाच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Facebook will go to self-sacrifice if Padmavat is released! Video viral in no time !! | ​‘पद्मावत’ रिलीज झाला तर फेसबुक लाईव्हवर आत्मदहन करेल! काहीच क्षणात व्हिडिओ व्हायरल!!

​‘पद्मावत’ रिलीज झाला तर फेसबुक लाईव्हवर आत्मदहन करेल! काहीच क्षणात व्हिडिओ व्हायरल!!

googlenewsNext
्वोच्च न्यायालय आणि सेन्सॉर बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतरही ‘पद्मावत’ला होत असलेला विरोध थांबलेला नाही. उलट राजपूत करणी सेनेने आपला विरोध आणखी तीव्र केला आहे.  इतके कमी की काय म्हणून एका व्यक्तिने या चित्रपटाच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा दिला आहे.  ‘पद्मावत’च्या विरोधात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे उपदेश राणा या व्यक्तिने ‘पद्मावत’ रिलीज झाला तर फेसबुक लाईव्हवर आत्मदहन करण्याची धमकी दिली आहे. उपदेश राणाच्या फेसबुक अकाऊंटवरून तो उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये राहणारा असल्याचे कळते. तूर्तास तो मुंबईत राहतोय. आपल्या फेसबुक इंट्रोमध्ये ‘जेहादी मानसिकतावाल्यांचा बाप’ असे त्याने लिहिले आहे.



गुजरातेत तोडफोड



काल शनिवारी रात्री उशीरा करणी सेनेच्या समर्थकांनी गुजरातच्या अहमदाबादेतील एका मल्टिप्लेक्समध्ये तोडफोड केली. शिवाय काही बसांना आगीही लावल्या. हा तीव्र विरोध बघता, गुजरात मल्टिप्लेक्स असोसिएशनने ‘पद्मावत’ न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री उशीरा ‘पद्मावत’ला विरोध करणाºया करणी सेनेच्या समर्थकांनी गुजरातेतील अहमदाबाद येथील राजहंस चित्रपटगृहात मोठी तोडफोड केली. मेहसाणा जिल्ह्यात काही बसगाड्यांना आग लावण्याच्या घटनाही समोर आल्या आहे. करणी सेनेच्या समर्थकांनी मल्टीप्लेक्सचे तिकिट काऊंटर पूर्णपणे ध्वस्त केले. या घटनेनंतर गुजरातच्या मल्टिप्लेक्स असोसिएशनने ‘पद्मावत’ प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सगळे घाबरलेलो आहोत. आम्हाला आमच्या संपत्तीचे नुकसान नकोय. त्यामुळेच आम्ही संपूर्ण गुजरातेत हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे, असे असोसिएशनचे डायरेक्टर राकेश पटेल यांनी म्हटले आहे.

भन्साळींचे निमंत्रण
‘पद्मावत’ ला होत असलेला विरोध दिवसांगणिक तीव्र होत असताना   या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी करणी सेनेला चित्रपट दाखवण्याचे निमंत्रण दिले आहे. अर्थात हे सगळे भन्साळींचे नाटक असल्याचे करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी म्हटले आहे. भन्साळींनी आत्ता कुठे आम्हाला चित्रपट दाखवण्याची तयारी दर्शवली आहे. हे सगळे त्यांचे नाटक आहे, असे कालवी म्हणाले.

Web Title: Facebook will go to self-sacrifice if Padmavat is released! Video viral in no time !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.