Fact Check: Alia Bhattच्या लेकीचा समोर आलेला पहिला फोटो खरा की खोटा?, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 02:08 PM2022-11-09T14:08:56+5:302022-11-09T14:09:31+5:30

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

Fact Check: Alia Bhatt's Lekki's First Photo Revealed True or Fake?, Know the Truth | Fact Check: Alia Bhattच्या लेकीचा समोर आलेला पहिला फोटो खरा की खोटा?, जाणून घ्या सत्य

Fact Check: Alia Bhattच्या लेकीचा समोर आलेला पहिला फोटो खरा की खोटा?, जाणून घ्या सत्य

googlenewsNext

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ची लेक सध्या चर्चेत आहे. आलिया भट रविवारी आई झाली. मुलीचा जन्म झाल्यामुळे कपूर आणि भट कुटुंबासोबतच त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत. रणबीर आणि आलियाचे चाहते बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, शेकडो बनावट फोटो इंटरनेट जगतात व्हायरल होत आहेत, ज्यात आलिया भट आणि रणबीरच्या मुलीचा फोटो असल्याचे सांगितले जात आहे.  बनावट फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. मात्र सत्य हे आहे की आजपर्यंत कपूर कुटुंब किंवा भट कुटुंब किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही सदस्याने बाळाचा कोणताही फोटो अद्याप शेअर केलेला नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो फोटोशॉपच्या माध्यमातून मॉर्फ करण्यात आली आहेत. यापैकी एकामध्ये एक मुलगी आलिया भटच्या शेजारी हॉस्पिटलमधील बेडवर विश्रांती घेताना दाखवण्यात आली आहे, तर दुसऱ्यामध्ये मुलगी आलियाच्या मांडीवर दिसत आहे. याशिवाय, एका व्हिडिओमध्ये आलियासोबत हॉस्पिटलमध्ये एक लहान मुलगी दिसत आहे. हे फोटो आणि व्हिडीओ खोटे आहेत. 

लेकीच्या जन्मानंतर आलिया भटने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना सिंहांच्या कुटुंबाचे स्केच शेअर केले. यासोबत अभिनेत्रीने लिहिले, 'आणि आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी - आम्हाला एक बाळ आहे... आणि ती एक जादुई मुलगी आहे.'


आलिया भट रविवारी, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता मुंबईतील गिरगावातील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये नेण्यात आले. तिथे दुपारी बाराच्या सुमारास आलियाला लेबर रूममध्ये नेण्यात आले. यावेळी रणबीर कपूरसोबत आलियाची सासू नीतू कपूर आणि आई सोनी राजदानही रुग्णालयात उपस्थित होत्या. रणबीर आणि आलिया याचवर्षी १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले. जून महिन्यात आलिया प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले.ही जोडी अलीकडेच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातही दिसली आहे.

Web Title: Fact Check: Alia Bhatt's Lekki's First Photo Revealed True or Fake?, Know the Truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.