युजवेंद्र चहल-RJ महावश रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या हार्दिक पांड्याच्या VIDEO मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:13 IST2025-03-25T14:12:40+5:302025-03-25T14:13:01+5:30

हार्दिक पांड्याने कन्फर्म केलं युजवेंद्र चहल आणि RJ महावशचं नातं?

fact check hardik pandya video confirming yuzvendra chahal rj mahavash relationship is ai generated | युजवेंद्र चहल-RJ महावश रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या हार्दिक पांड्याच्या VIDEO मागचं सत्य

युजवेंद्र चहल-RJ महावश रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या हार्दिक पांड्याच्या VIDEO मागचं सत्य

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि  धनश्री वर्माचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या चर्चा असतानाच युजवेंद्र आर जे महावशसोबत दिसत होता. दोघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीही स्टेडियममध्ये बसून एकत्रच पाहिली. त्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले आणि दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा सुरु झाल्या. अशातच आता हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) युजवेंद्र आणि महावशचं नातं कन्फर्म केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र हा व्हिडिओ खरा आहे की फेक जाणून घ्या.

काय आहे व्हिडिओ?

सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये हार्दिक म्हणतो, "मला एक दिवस एकाचा फोन आला होता. तो युजवेंद्रबद्दल चौकशी करत होता. युजवेंद्रला सगळेच एकदम मजेशीर, प्रेमळ मनाचा म्हणून ओळखतात. पण घटस्फोटानंतर तो ज्या परिस्थितीतून गेला आहे ते कठीण होतं. एखादं नातं संपतं तेव्हा ते स्वीकारणं खूप अवघड असतं. त्याच्यासारखा माणूस ज्याच्या मनात ते दु:ख साचून राहिलं त्यामुळे त्याच्यासाठी तर ते आणखी जास्त कठीण होतं. मी त्याला संघर्ष करताना पाहिलं आहे. माझ्यासाठी हे महत्वाचं होतं मी ज्या स्टेजला आहे मलाही अशा व्यक्तीकडे जायचं होतं जो मला समजून घेईल आणि जो माझ्यासारख्याच परिस्थितीतून गेला असेल. पण आता त्याला पुन्हा हसताना पाहून खूप छान वाटत आहे. महावशने त्याच्या आयुष्यात सकारात्मकता आणली आहे. तो या आनंदासाठी पात्र आहे. एकदम कंटेंट आणि खूश असा तो आहे. जर हे महावशमुळे असेल तर मी माझ्या भावासाठी खूप खूश आहे. मी नेहमीच अर्धा ग्लास रिकामा असल्यापेक्षा अर्धा ग्लास भरलेला आहे हे पाहतो."


व्हिडीओ खरा की खोटा?

हार्दिकचा हा व्हिडीओ जुना आहे याबाबत शंका नाही. हार्दिकने घातलेला टी-शर्ट गुजरात टायटन्स संघाचा आहे. हार्दिकने २०२४ मध्येच गुजरात संघ सोडला आहे. तो गेल्या वर्षापासून मुंबई इंडियन्स संघाकडून कर्णधार म्हणून खेळतोय. युजवेंद्र-धनश्रीचा घटस्फोट गेल्या १० दिवसांत झाला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ AI जनरेटेड आहे. व्हिडीओ एडिट केलेला असून याचा चहलच्या घटस्फोटाशी किंवा RJ महावशशी रिलेशनशिपशी काहीही संबंध नाही. फॅक्ट चेक केल्यानंतर हे लक्षात येतं की हार्दिकचा हा व्हिडिओ फेक आहे. अनेकांनी व्हिडिओखाली AI जनरेटेड व्हिडिओ अशाच कमेंट्स केल्या आहेत.

Web Title: fact check hardik pandya video confirming yuzvendra chahal rj mahavash relationship is ai generated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.