काय सांगता? कुटुंब व मित्रांनीच Kartik Aaryanला केलं ‘बॉयकॉट’, वाचा कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 03:30 PM2022-05-06T15:30:53+5:302022-05-06T15:34:42+5:30
Kartik Aaryan : ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून कार्तिकचा डेब्यू झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत त्यानं करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले. आज कार्तिक बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार आहे. पैसा, प्रसिद्धी, यश सगळं काही त्याच्याजवळ आहे. पण...
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन (Kartik Aaryan ) सध्या जाम चर्चेत आहे. अर्थात कारण आहेच. कार्तिकचा ‘भूल भुलैय्या 2’ ह चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्तिकही धडाक्यात या चित्रपटाचं प्रमोशन करतोय. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून कार्तिकचा बॉलिवूड डेब्यू झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत त्यानं करिअरमध्ये अनेक चढऊतार अनुभवले आणि शेवटी हवं ते मिळवलंच. आज कार्तिक बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार आहे. पैसा, प्रसिद्धी, यश सगळं काही त्याच्याजवळ आहे. पण इतकं असूनही एक गोष्ट ‘मिसींग’ आहे. होय, स्टारडम मिळाल्यानंतर एक गोष्ट कार्तिक सतत मिस करतो. (Family-friends upset with Kartik Aaryan's stardom)
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक यावर बोलला. स्टारडम मिळाल्यानंतर तू कोणती गोष्ट मिस करतोस? असा प्रश्न त्याला केला गेला. यावर कार्तिकने फॅमिली आणि फ्रेन्ड्स असं उत्तर दिलं. होय, स्टारडममुळे कार्तिकला त्याच्या फॅमिली व फ्रेन्ड्सनी जवळजवळ बॉयकॉट केलं आहे.
कार्तिकने म्हणाला, ‘मित्र वा कुटुंबीयांसोबत डिनरला जातो, तेव्हा मला प्रायव्हसी मिळत नाही. चाहते सेल्फीसाठी गर्दी करतात. मी त्यांना नाराज करू शकत नाही. मग डिनरपेक्षा अर्धा अधिक वेळ सेल्फी देण्यातच निघून जातो. माझ्या सोबतचे मित्रमंडळी, कुटुंबीय यामुळे नाराज होतील, हे चाहत्यांना कळत नाही. दोष त्यांचाही नाही. माझे कुटुंबीय व मित्र खूप तक्रार करतात. आता तर माझ्यासोबत त्यांना बाहेर जायचंच नसतं. त्यांनी मला बायकॉट केलं आहे. मी सोबत असलो की, सगळं अटेंशन मीच घेतो, असं ते म्हणतात. तू सोबत असणं म्हणजे पंगा, असं म्हणत त्यांनी मला त्यांच्यातून पूर्णपणे वगळून टाकलंय, ’असं कार्तिक म्हणाला.
स्टारडमसोबत क्रिटिसिज्मही येतं. यावरही कार्तिक बोलला. टीका करणाºयांची मला मुळीच पर्वा नाही. स्वत:त ज्या काही त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी फुल्ल अॅटिट्यूडमध्ये जगतो, असंही तो म्हणाला.