‘द फॅमिली मॅन 2’ रिलीजनंतर शरद केळकरला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, कारण वाचून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 11:22 AM2021-07-04T11:22:38+5:302021-07-04T11:25:12+5:30
‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजचा दुसरा पार्ट आला आणि गाजला. सीरिजमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. अपवाद फक्त मराठमोळ्या शरद केळकरचा म्हणावा लागेल.
‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजचा दुसरा पार्ट (The Family Man 2)आला आणि गाजला. सीरिजमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. अपवाद फक्त मराठमोळ्या शरद केळकरचा म्हणावा लागेल. होय, या सीरिजमध्ये अरविंदची भूमिका साकारणा-या शरद केळकरला (Sharad Kelkar ) सध्या सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. होय, कारण काय तर मनोज वाजपेयीच्या पत्नीसोबत त्याने केलेले ‘फ्लर्ट’. होय, शरदने सीरिजमध्ये मनोज बाजपेयी म्हणजेच श्रीकांत तिवारीची पत्नी सुची (प्रियामणी) हिच्या मित्राची भूमिका साकारली आहे. नेमक्या याच भूमिकेमुळे शरदला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. एका ताज्या मुलाखतीत शरदने खुद्द हा खुलासा केला. (The Family Man actor Sharad Kelkar gets threats)
सीरिजमध्ये अरविंद व सुची एकमेकांचे चांगले मित्र असतात. शरद नोकरी सोडून एक कंपनी उघडतो. सुची सुद्धा या कंपनीत त्याला ज्वॉईन करते. कंपनीच्या मीटिंगसाठी दोघेही लोणवळ्याला जातात आणि खूप रात्र झाल्याने एकाच हॉटेलमध्ये थांबतात. नंतर काय होते, हे सीरिजमध्ये दाखवलेले नाही. पण लोणावळ्यातून परत आल्यावर सुची तिची नोकरी करते आणि यनंतर तिच्यात व तिचा पती श्रीकांत त्यांच्या दुरावा निर्माण व्हायला लागतो. अर्थात ती पुन्हा नोकरीवर परतते.
या सीरिजनंतर शरदला अनेक धमक्या मिळत आहेत. शरदने याबद्दल सांगितले, फॅमिली मॅन 2 नंतर मला सोशल मीडियावर अनेक धमक्या मिळत आहेत. मी साकारलेल्या अरविंद या भुमिकेमुळे लोक माझा तिरस्कार करू लागले आहेत. अरविंद सुचीपासून दूर राहा, असे मॅसेज मला मिळत आहेत. काहींनी तर मला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. श्रीकांत व सुचीच्या आयुष्यापासून दूर राहा, नाहीतर तुला जीवे मारू, असे मॅसेज लोक करत आहेत. अर्थात आता मला आता याची सवय झाली आहे. मुळात या धमक्या नाही तर मी उत्तम भूमिका साकारलीये, याची पावती आहे, असे मी समजतो.
अरविंद आणि सुची यांच्यात लोणावळ्याच्या त्या हॉटेलमध्ये काय घडलं याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. मात्र वेब सीरिजमध्ये या दोघांमध्ये नेमकं काय घडलं हे दाखवलेले नाही.