​चहा आणि लॉटरी विकून घर चालवायचा हा प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 05:04 AM2018-02-21T05:04:18+5:302018-02-21T10:34:18+5:30

अन्नू कपूर यांनी मंडी, बेताब, मिस्टर इंडिया, राम लखन, चालबाज, घायल, जमाई राजा, ऐतराज यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ...

The famous actor who runs the house by selling tea and lottery | ​चहा आणि लॉटरी विकून घर चालवायचा हा प्रसिद्ध अभिनेता

​चहा आणि लॉटरी विकून घर चालवायचा हा प्रसिद्ध अभिनेता

googlenewsNext
्नू कपूर यांनी मंडी, बेताब, मिस्टर इंडिया, राम लखन, चालबाज, घायल, जमाई राजा, ऐतराज यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अंताक्षरी या कार्यक्रमाचे तर अन्नू यांनी अनेक वर्षं सूत्रसंचालन केले. अन्नू यांच्यामुळे या कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. अन्नू यांना त्याच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आज केवळ अभिनेताच नव्हे तर दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील आपले एक स्थान निर्माण केले आहे. अन्नू कपूर यांचा सुहाना सफर हा कार्यक्रम सध्या चांगलाच लोकप्रिय आहे.
अन्नू कपूर यांनी आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांचा जन्म पंजाबमधील एका छोट्याशा गावात झाला. त्यांची आई बंगाली असून त्यांचे वडील पारसी थिएटर कंपनी चालवत असे. त्यांची कंपनी गावागावात जाऊन परफॉर्म करत असे आणि त्यामुळे त्यांना सगळे नौटंकीवाला असेच म्हणत असत. त्यांच्या आई या क्लासिकल डान्सर होत्या. अन्नू यांना लहानपणापासून आयएएस ऑफिसवर बनण्याची इच्छा होती. पण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घर चालवण्यासाठी अन्नू चहाचा स्टॉल चालवायला लागले. पण त्यांचा चहाचा स्टॉल तोट्यात चालत असल्याने त्यांनी लॉटरी विकायला सुरुवात केली. अन्नू वडिलांच्या नाटक कंपनीत काम करत होते. त्यामुळे त्यांनी याच क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अॅडमिशन घेतले. याच काळात त्यांचे एक नाटक श्याम बेनेगल यांनी पाहिले आणि त्यांनी मंडी या त्यांच्या चित्रपटात काम करण्याची अन्नू यांना संधी दिली. 

annu kapoor

अन्नू कपूर यांच्या व्यवसायिक आयुष्यासोबत त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे. त्यांचे पहिले लग्न अनुपमासोबत झाले होते. ती त्यांच्या पेक्षा १३ वर्षांनी लहान होती. पण त्यांच्या सतत होणाऱ्या वादांमुळे त्यांनी लग्नाच्या १७ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. अनुपमा घटस्फोटानंतर अमेरिकेला निघून गेली. अनुपमासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरुनिता त्यांच्या आयुष्यात आली. अंताक्षरी या कार्यक्रमाच्या सेटवर त्या दोघांची भेट झाली होती. त्या दोघांनी काहीच महिन्यांच्या ओळखीनंतर लग्न केले. पण अन्नू कपूर घटस्फोटीत असल्याची तिला कल्पनाच नव्हती. तिला ही गोष्ट त्यांच्या लग्नानंतर कळली आणि त्यात लग्नानंतर अन्नू यांचे एका स्त्रीसोबत अफेअर असल्याची कुणकुण अरुनिताला लागली. ही स्त्री दुसरी कोणी नसून अन्नू कपूर यांची पहिली पत्नी अनुपमा होती. अनुपमा अन्नू यांच्या आयुष्यात पुन्हा आल्यानंतर अन्नू यांनी अरुनिताला त्यांचे ओशिवाराचे घर रिकामे करायला सांगितले. तसेच तिला घर खर्चासाठी पैसे देणे देखील बंद केले. ते अनुपमासोबत राहायला लागले होते. हे सगळे कळल्यानंतर अरुनिताने त्यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना अराधिता नावाची एक मुलगी देखील आहे. अरुनितासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी अनुपमाशी पुन्हा लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. 

Also Read : ओम पुरी यांना त्यांची दुसरी पत्नी त्रास देत होती; अन्नू कपूरचा खुलासा

Web Title: The famous actor who runs the house by selling tea and lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.