​या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत डॅनी डेंझोपा चार वर्षं होता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 05:39 AM2017-10-04T05:39:35+5:302017-10-04T11:09:35+5:30

डॅनी डेंझोपाने बॉलिवूडमधील खलनायक म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. तुम्हाला माहीत आहे का हा खलनायक एका अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा ...

With this famous actress Danny Dunjoppa was four years old in the live-in relationship | ​या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत डॅनी डेंझोपा चार वर्षं होता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

​या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत डॅनी डेंझोपा चार वर्षं होता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

googlenewsNext
नी डेंझोपाने बॉलिवूडमधील खलनायक म्हणून चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. तुम्हाला माहीत आहे का हा खलनायक एका अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता आणि तो तिच्यासोबत चार वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. त्या काळात लिव्ह इन रिलेशनशिप म्हटले की लोकांच्या भुवया उंचवायच्या. पण तरीही तो त्या अभिनेत्रीसोबत अनेक वर्षं राहात होता. एवढेच नव्हे तर ब्रेकअपनंतर देखील त्या दोघांचे नाते आयुष्यभर मैत्रीत्वाचे राहिले.

parveen babi

डॅनीच्या आयुष्यात असलेली ही अभिनेत्री ही परबीन बाबी होती. परबीनसोबतच्या नात्याबाबत डॅनीने त्याच्या अनेक मुलाखतीत सांगितले आहे. परबीन त्याची पहिली प्रेयसी असल्याचे त्याने अनेकवेळा कबूल देखील केले आहे. त्याने अनेक वर्षांपूर्वी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, आम्ही चार वर्षं एकत्र राहात होतो. त्यावेळी मी आणि परबीन आमच्या तारुण्यात होतो. तो वेळ खरंच खूप सुंदर होता. काही वर्षांनी आम्ही दोघांनी ब्रेकअप केले. पण आम्ही शेवटपर्यंत खूप चांगले फ्रेंड्स होतो. ब्रेकअपनंतरही परबीन मला अनेकवेळा तिच्या घरी जेवायला बोलवायची. त्यावेळी अभिनेत्री किमसोबत माझे नाते होते. तुमच्या घरात सतत तुमची पूर्वप्रेयसी आहे हे कोणतीही प्रेयसी सहन करून शकत नाही. यावरून किम माझ्यावर अनेकवेळा चिडायची. एकदा तर आम्ही चित्रीकरणावरून घरी परत आलो तर परवीन माझ्या घरात व्हीसीआरवर चित्रपट पाहात बसली होती. किमला ते अजिबातच पटले नव्हते. पण आम्ही केवळ फ्रेंड्स आहोत, असेच परबीनचे म्हणणे असायचे. 
डॅनीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेता कबीर बेदी, दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत परबीनचे सूत जमले. पण असे असूनही शेवटच्या क्षणी ती एकटीच होती. २२ जानेवारी २००५ला तिच्या राहत्या घरी तिचे निधन झाले. तीन दिवस तिने घराच्या समोरील दूध, पेपर न घेतल्याने शेजारच्यांना काहीतरी गोंधळ असल्याचा संशय आला होता. पोलिसांनी तिच्या घरचा दरवाजा तोडल्यानंतर तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. पोस्टमार्टमनुसार तिचे ७२ तासांपूर्वीचे निधन झाले होते. तिच्या अंतिमसंस्काराला देखील डॅनीने आवर्जून उपस्थिती लावली होती. 

Also Read : ​महेश भटचे होते "या" अभिनेत्रीशी अफेयर, अमिताभ बच्चनकडून होता जीवाला धोका?

Web Title: With this famous actress Danny Dunjoppa was four years old in the live-in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.