ओळखलं का फोटोतील चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 16:16 IST2024-02-06T16:11:30+5:302024-02-06T16:16:55+5:30
आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

ओळखलं का फोटोतील चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री
बॉलिवूड मधील सर्वच कलाकार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहतात. आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या आवडीचा अभिनेत्री ही लहानपणी कशी दिसायची ती कोणत्या शाळेत शिकत होती, इथपासून सर्व माहिती चाहत्यांना माहित करून घ्यावीशी वाटते.
अशातच सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. अनेक जण सोशल मीडियावरती एकमेकांना चॅलेंज देत आहेत. हा फोटो कुणाचा आहे हे ओळखण्यात खूप कमी जण यशस्वी ठरले आहेत. तुम्हाला देखील हा फोटो नेमका कोणत्या अभिनेत्रीचा आहे, हे समजले नसेल तर आम्ही तुम्हाला हिंट देतो, की ती फिफा ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली भारतीय आहे. तर ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून दीपिका पादुकोण आहे. हा फोटो पाहून चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. दीपिकाचा हा फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे.
दीपिकाचा 'फायटर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. दीपिका आणि हृतिकमधील हे हॉट सीन्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. तर याआधी दीपिका 'पठाण' आणि 'जवान' सिनेमात झळकली होती. दीपिकाने आतापर्यंत अनेक हीट चित्रपट दिले आहेत. तिनं ओम शांती ओम, रामलीला, ये जवानी है दिवानी अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उत्तम अभिनयामुळे ओळखली जाणारी दिपिका तिच्या अफेअर्समुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे.