प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य दिसणार 'पिंटू की पप्पी' सिनेमात, साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:30 IST2025-03-10T17:30:25+5:302025-03-10T17:30:57+5:30

Ganesh Acharya : सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी 'पिंटू की पप्पी' चित्रपटात साकारलेली महत्त्वाची भूमिका लक्षवेधी असणार आहे.

Famous choreographer Ganesh Acharya will be seen in the movie 'Pintu Ki Pappi', will play an important role | प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य दिसणार 'पिंटू की पप्पी' सिनेमात, साकारणार महत्त्वाची भूमिका

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य दिसणार 'पिंटू की पप्पी' सिनेमात, साकारणार महत्त्वाची भूमिका

सिनेइंडस्ट्रीत सध्या कॉमेडी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एक बॉलिवूड चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे. 'पिंटू की पप्पी' (Pintu Ki Pappi Movie) असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट बॉलिवूड विश्वात धुमाकूळ घालायला सज्ज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि अगदी उत्तम असा प्रतिसादही या चित्रपटाला मिळालेला पाहायला मिळाला. ट्रेलरबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनी रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सर्वत्र सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे. 

सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी या चित्रपटात साकारलेली महत्त्वाची भूमिका लक्षवेधी असणार आहे. 'पिंटू की पप्पी' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित रोमँटिक कॉमेडी चित्रपट ट्रेलर रिलीजपासूनच प्रेक्षकांमध्ये धुमाकूळ घालत आहे. V2S प्रॉडक्शन आणि एण्टरटेन्मेंटच्या या चित्रपटाच्या विधी आचार्य निर्मात्या आहेत. तर लेखक, दिग्दर्शक म्हणून शिव हरे यांनी बाजू सांभाळली आहे.

'पिंटू की पप्पी' चित्रपट या दिवशी भेटीला

चित्रपटामध्ये गणेश आचार्य यांच्यासह विजय राज, मुरली शर्मा, सुनील पाल, अली असगर, पूजा बॅनर्जी, अदिती संवाल, रिया एस सोनी, उर्वशी चौहान, प्यूमोरी मेहता दास, मुक्तेश्वर ओझा अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. शिव हरे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सिनेसृष्टीत एक हास्याची उमेद घेऊन येणार आहे. २१ मार्च २०२५ रोजी हा ‘पिंटू की पप्पी’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Famous choreographer Ganesh Acharya will be seen in the movie 'Pintu Ki Pappi', will play an important role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.