प्रसिद्ध कॉमेडियन वीर दासने रचला इतिहास, पटकावला आंतरराष्ट्रीय Emmy पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 12:03 IST2023-11-21T12:00:22+5:302023-11-21T12:03:18+5:30
वीर दासने देशाचं नाव उंचावत बेस्ट कॉमेडी कॅटेगरीत पुरस्कार पटकावला.

प्रसिद्ध कॉमेडियन वीर दासने रचला इतिहास, पटकावला आंतरराष्ट्रीय Emmy पुरस्कार
लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासने (Vir Das) नुकताच इतिहास रचला आहे. ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये बेस्ट कॉमेडीसाठी त्याला पुरस्कार मिळाला आहे. एमी अवॉर्ड्ससाठी शेफाली शाह आणि जिम सर्भ यांना देखील नॉमिनेशन मिळाले होते मात्र दोघांचाही पुरस्कार हुकला. तर वीर दासने देशाचं नाव उंचावत बेस्ट कॉमेडी कॅटेगरीत पुरस्कार पटकावला. नेटफ्लिक्स स्पेशल शो 'वीर दास: लँडिंग' साठी त्याला पुरस्कार मिळाला.
विशेष म्हणजे याआधीही वीर दासला एमी साठी नॉमिनेशन होते मात्र तेव्हा त्याला पुरस्कार मिळाला नाही. यावेळी केवळ नॉमिनेशनच नाही तर त्याने पुरस्कारही नावावर केला आहे. वीर दास शोसोबतच ब्रिटीश कॉमेडी सीरिज Derry Girls season 3 लाही बेस्ट कॉमेडीचा पुरस्कार मिळाला.
एमी अवॉर्ड पटकावल्यानंतर वीर दासचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपला आनंद व्यक्त करताना तो म्हणाला,'भारतासाठी, भारतीय कॉमेडीसाठी. प्रत्येक श्वास, प्रत्येक शब्द. या अद्भूत पुरस्कारासाठी एमी चे आभार.'
वीर दासच्या या यशानंतर त्याला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'तू यासाछी पात्र आहेस' अशी कमेंट आयुष्मान खुरानाने केली आहे. तसंच इतर स्टॅण्डअप कॉमेडीयननेही त्याचं अभिनंदन केलं आहे.