पंजाबी सिंगर AP Dhillon रुग्णालयात दाखल, फोटो पाहून हैराण झालेले चाहते म्हणाले- हे सर्व कसे घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:34 IST2022-11-01T14:26:49+5:302022-11-01T14:34:19+5:30
जगभरातील एपी धिल्लनचे चाहते त्याचे फोटो बघून चिंतेत आहेत. त्याने हॉस्पिटलच्या बेडवरील जखमी अवस्थेतील आपला फोटो शेअर केला आहे.

पंजाबी सिंगर AP Dhillon रुग्णालयात दाखल, फोटो पाहून हैराण झालेले चाहते म्हणाले- हे सर्व कसे घडले?
पंजाबी गायक आणि रॅपर एपी ढिल्लन (AP Dhillon) चाहत्यांसाठी एक शॉकिंग बातमी आहे. एपी ढिल्लनचा एका भीषण अपघात झाला असून सध्या तो रुग्णालयात दाखल आहेत. खुद्द सिंगरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. फोटोमध्ये तो जखमी अवस्थेत हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. यासोबतच त्याने त्याच्या चाहत्यांसाठी एक पोस्ट लिहिली आहे.
एपी ढिल्लनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ही स्टोरी शेअर केली आणि लिहिले, 'कॅलिफोर्नियातील माझ्या सर्व चाहत्यांना कळवताना मला अत्यंत दु:ख होतेय की SF आणि LA मधील माझे शो पुढे ढकलले जात आहेत. या दौऱ्यात मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. सध्या मी ठीक आहे आणि लवकरच पूर्णपणे बरा होईन पण सध्या मी परफॉर्म करू शकणार नाही.
एपी ढिल्लनने पुढे लिहिले की, 'मी लवकरच तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक आहे. माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. मी तुम्हाला काही आठवड्यांनी भेटेन. तुमची तिकिटं नवीन शेड्यूल केलेल्या शोसाठी वैध असतील.
एपी ढिल्लन यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. त्याचे शो जगभरात लोकप्रिय आहेत. अनेक सेलेब्स एपी धिल्लनच्या कॉन्सर्टचा आनंद लुटताना दिसत असतात. एपी ढिल्लनच्या या पोस्टमुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. त्याला लवकर बरं वाटावा यासाठी ते प्रार्थना करत आहेत.