रजनीकांतचा 'जेलर' बघणार का? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, 'मला रजनी सर...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 17:09 IST2023-08-11T17:08:14+5:302023-08-11T17:09:07+5:30
साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' सिनेमा कालच थिएटर्समध्ये रिलीज झाला.

रजनीकांतचा 'जेलर' बघणार का? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, 'मला रजनी सर...'
बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. चाहत्यांची तर उत्सुकता प्रचंड ताणली आहे. 'जवान'च्या निमित्ताने शाहरुख अनेकदा चाहत्यांशी संवाद साधत असतो. ट्वीटरवर बऱ्याचदा तो चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतो. नुकतंच त्याने ट्वीटरलर आस्क एसआरके हे सेशन घेतलं. यामध्ये त्याला रजनीकांतविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. यावर शाहरुखने थलायवासाठी असलेलं प्रेम व्यक्त केलं.
साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' सिनेमा कालच थिएटर्समध्ये रिलीज झाला. पहिल्याच दिवशी थिएटरबाहेर चाहत्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत सेलिब्रेशन केले. रजनीकांतचा सिनेमा म्हणलं की आजही चाहत्यांमध्ये तितकाच उत्साह संचारतो. तर शाहरुख खान 'जेलर' पाहणार का असा प्रश्न एका चाहत्याने विचारला असता किंग खान म्हणाला, 'नक्कीच...मला रजनी सर आवडतात. प्रचंड चाहते असलेला अभिनेता. ते आम्हाला जवानच्या सेटवर भेटायला आले होते. त्यांनी आम्हाला आशिर्वाद दिले. '
Of course I love Rajni sir….Maassss!! He had come on Jawan set and blessed us too. #Jawanhttps://t.co/cKaqMlR8c4
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 10, 2023
गेल्या वर्षीच साऊथ अभिनेत्री नयनताराच्या लग्नात शाहरुख खानने हजेरी लावली होती. तिथेच त्याची रजनीकांतशी भेट झाली. त्याने थलायवासोबत एक फोटोही काढला. रजनीकांतच्या वाढदिवशी तो सेल्फी शेअर करत शाहरुखने शुभेच्छा दिल्या होत्या.
शाहरुख आणि रजनीकांत यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहेच. पण स्वत: शाहरुखच रजनीकांतचा चाहता असल्याचं दिसून आलं. शाहरुखचा 'जवान' सप्टेंबर महिन्यात रिलीज होत आहे. साऊथ दिग्दर्शक अॅटलीने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर साऊथ अभिनेत्री नयनताराची सिनेमात महत्वाची भूमिका आहे.