Sonu Sood : भारीच! सोनू सूदकडे चाहत्याने केली तब्बल 1 कोटीची मागणी; अभिनेत्याने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 02:48 PM2021-08-24T14:48:21+5:302021-08-24T14:56:25+5:30
fan asked sonu sood to give him 1 crore know actor hilarious response : एका चाहत्याने सोनू सूदकडे थेट एक कोटी रुपयांची मागणी केली.
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जणांनी पुढाकार घेतला आहे. अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर लोक त्याला अनेक विचित्र प्रश्न विचारत आहेत तर काही जण भलत्याच मागण्या करत आहेत. अशातच एका मागणीला सोनूने खास उत्तरही दिलं आहे.
एका चाहत्याने सोनू सूदकडे थेट एक कोटी रुपयांची मागणी केली. महेंद्र दुर्गे नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. "सोनू सूद सर, 1 कोटी मला हवेत" असं म्हटलं आहे. यावर सोनू सूदने देखील भन्नाट उत्तर दिलं आहे. "फक्त एक कोटी रुपये? थोडे अधिक मागितले असते..." असं म्हटलं आहे. यासोबतच सोनू सूदने एक हसणारा इमोजी देखील पोस्ट केला आहे. हे ट्विट आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून सोनूने दिलेलं भन्नाट उत्तर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. तसेच याआधी देखील अनेकदा सोनू सूदने विचित्र मागण्यांना हटके उत्तर दिलं आहे.
बस 1 करोड़ ??
— sonu sood (@SonuSood) August 23, 2021
थोड़े जायदा ही मांग लेता 😂 https://t.co/5h3KkCrrEA
सोनू सूद नेहमीच लोकांची मदत करताना दिसतो. त्याच्या घराची दारं गरजू लोकांसाठी नेहमीच उघडी असतात. नुकतीच एक महिला आपल्या पतीची तक्रार घेऊन अभिनेत्याकडे पोहोचली. सोनू सूदनेही महिलेचं म्हणणं ऐकून घेतलं आणि नंतर तिच्या समस्येचं समाधान काढलं. सोनू सूदचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नुकतात अभिनेता एका महिलेच्या खाजगी आयुष्यात सुरू असलेली समस्या दूर करताना दिसला. एक महिला आपल्या पतीची तक्रार घेऊन सोनू सूदकडे आली होती. सोनू सूदने महिलेची समस्या समजून घेत महिलेच्या पतीला व्हिडीओ कॉल केला आणि त्याला म्हणाला की, मला गॅरंटी द्या की तुम्ही मुलीची काळजी घ्याल, तुम्ही मला गॅरंटी द्या आणि मग मी तुमच्या मुलीसोबत तुम्हाला भेटणार.
सोनू सूदचे या व्हिडीओवर फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. अभिनेत्याच्या मोठ्या मनाचं सगळेजण कौतुक करत आहेत. सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून लोकांची मदत करताना दिसत आहे. त्यासंबंधी त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोनू सूदने कोरोना काळात अनेक गरजू लोकांची मदत केली. त्यामुळे तो अनेकांच्या आयुष्यातील सुपरहिरो ठरला आहे. पण तो सिनेमात व्हिलनच्या भूमिका साकारतो. आज तो साउथ सिनेमांमधील सर्वात लोकप्रिय व्हिलनपैकी एक आहे. तर बॉलिवूडमध्येही त्याची वेगळी जागा आहे.