Ranbir Kapoor : रणबीर कपूरला पाहताच चाहतीचा सुटला ताबा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 17:30 IST2023-03-05T17:30:15+5:302023-03-05T17:30:54+5:30
Ranbir Kapoor : होय, एका इव्हेंटमध्ये एका चाहतीने रणबीरसोबत असं काही केलं की नेटकरी खवळले. हा पुरूषांचा विनयभंग नाही का, असा सवाल नेटकऱ्यांनी केला.

Ranbir Kapoor : रणबीर कपूरला पाहताच चाहतीचा सुटला ताबा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'च्या (Tu Jhoothi Main Makkaar) प्रमोशनमध्ये बिझी आहे. मुंबईत अशाच एका मुंबईतील प्रमोशनल इव्हेंटमधला रणबीरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. होय, या इव्हेंटमध्ये एका चाहतीने रणबीरसोबत असं काही केलं की पाहून सगळेच हैराण झालेत. यानंतर सोशल मीडियावर जणू घमासान सुरू झालं. अनेकांनी चाहत्याच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. हा पुरुषांचा विनयभंग नाही का, हेच जर एखाद्या अभिनेत्रीसोबत घडलं असतं तर, असे सवाल सोशल मीडिया युजर्सनी उपस्थित केले.
शनिवारी रणबीर 'तू झुठी मैं मक्कार'च्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात तो पोहोचला. रणबीरला पाहून चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सगळेच जणू तुटून पडले. याचदरम्यान एका चाहतीने रणबीर कपूरला किस करण्याचा आणि स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. रणबीरही या प्रकारामुळे काही क्षण अस्वस्थ झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्सनी त्या चाहतीच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. सेलिब्रिटी पुरूष असो वा महिला चाहत्यांनी त्यांना भेटताना आपली मर्यादा पाळायला हवी, अशी कमेंट एका युजरने केली. ती हे कसं करू शकते, माझा तर विश्वासच बसत नाहीये..., असं एक युजर म्हणाला. ती एखाद्याच्या संमतीशिवाय आणि तो एक कौटुंबिक माणूस आहे हे माहीत असतानाही त्याला स्पर्श कसा करू शकते, हे लोक वेड्यासारखे वागतात, हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने केली.
लव रंजन दिग्दर्शित तू झुठी मैं मक्कार मार्चमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन कॅमिओ करताना दिसणार आहे. चित्रपटात रणबीर कपूरसोबत श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहे. येत्या ८ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.