कायम माणूसकी आणि साधेपणा जपणाऱ्या शबाना आझमी यांचा फोटो पाहून चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:16 IST2021-03-22T12:08:47+5:302021-03-22T12:16:24+5:30
Shabana lifestyle has always been role model for most of fans. शबाना यांच्या मदतनीस जयश्री यांनी जावेद आणि शबाना दोघांनाही आहेर दिला

कायम माणूसकी आणि साधेपणा जपणाऱ्या शबाना आझमी यांचा फोटो पाहून चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
नेहमीच सेलिब्रिटी त्यांचे सिनेमे , महागड्या फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असतात. पण आपल्याच माणसात राहून माणूसकी जपणारे कलाकार फारच कमी पहायला मिळतात.
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या मदनीस जयश्री यांच्या सोबत हा फोटो शेअर केला आहे. त्याचं झालं असं की..शबाना यांच्या मदतनीस जयश्री यांनी जावेद आणि शबाना दोघांनाही आहेर दिला. जयश्री यांच्या मुलींचं लग्न झाले त्याचाच हा आहेर होता. शाबाना आणि जावेद यांनी तेच कपडे परिधान केल्याचे दिसतंय. हाच आनंद दोघांनीही त्यांच्यापर्यंत न ठेवता चाहत्यांसह शेअर केला आहे. हा फोटो पाहून साऱ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.
मुळात. शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची प्रेक्षकांच्या मनात त्याची एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली असून, त्यांच्या करिअरबरोबरच सामाजिक जीवनातही नेहमीच अग्रेसर राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
जाणून घ्या, शबाना आझमी यांच्याबद्दल काही खास गोष्टी...!
१९८४ मध्ये शबाना यांनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले. जावेद यांचा हा दुसरा विवाह होता. जावेद शबानांच्या अब्बांना भेटायला येत. याचदरम्यान शबाना व जावेद यांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम. १९८४ मध्ये जावेद यांनी आपल्या पहिल्या पत्नीला ‘तलाक’ देत शबानांशी लग्न केले. जावेद आधीच विवाहित होते, याचदरम्यान जावेद आणि त्यांची पत्नी हनी यांच्यातील मतभेद वाढले.
शेवटी ते दोघेही वेगळे झालेत आणि शबाना व जावेद यांनी लग्न केले. जावेद कायम मला सेन्स आॅफ सिक्युरिटी देतो. तो माझ्या अब्बासारखा आहे. मग ती शायरी असो किंवा राजकारण वा सामाजिक मुद्दा तो परखडपणे बोलतो, असे शबाना जावेद यांच्याबद्दल बोलल्या होत्या.