ही प्रेग्नंट आहे का ? परदेस गर्ल महिमा चौधरीला पाहून चाहतेच पडले संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 06:15 PM2021-03-16T18:15:15+5:302021-03-16T18:22:23+5:30
Mahima Chaudhary happily spotted for the first time At The Airport: ज्या प्रकारे ती पोटावरुन हात फिरवत होती त्यावरून ती प्रेग्नंट असल्याचेच नेटीझन्स सांगत आहेत.
लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच परदेस गर्ल महिमा चौधरी एरअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तिने लाल रंगाच्या कॅज्युअल ड्रेसिंगमध्ये ती दिसली. डोळ्यावर गॉगल पण मास्क काही चेह-यावर लावला नव्हता. विनामास्कच एरअरपोर्टवर ती फिरताना दिसली. मुळात मीडियाचे कॅमेरे बघताच महिमा फार खुश झाली. इतकेच काय तर वजन कमी केल्याचा आनंदही तिने थेट मीडियाला सांगितला. वजन कमी केल्याने तिच्या लूकमध्येही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फिट ती दिसत आहे. मात्र यावेळी तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते जरा संभ्रातच पडल्याचे पाहायला मिळाले. महिमा प्रेग्नंट असल्याचे अनेकांना वाटले, कारण ती वारंवार तिच्या पोटाला हात लावत होती. त्यामुळे महिमाच्या पोटावरच सा-यांचे लक्ष गेले आणि ज्या प्रकारे ती पोटावरुन हात फिरवत होती त्यावरून ती प्रेग्नंट असल्याचेच नेटीझन्स सांगत आहेत.
'परदेस'मध्ये महिमा चौधरीने गावातील मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमामुळे महिमाला अमाप लोकप्रियता मिळाली होती. महिमा चौधरीने शाहरुख खानसोबत 'परदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात महिमाच्या सौंदर्य, हास्य आणि अभिनयाचं कौतुक झालं होतं. मात्र महिमा यशाच्या शिखरावर असताना एका घटनेने तिच्या फिल्मी करिअरला ब्रेक लागला.
तिची कार एका ट्रकला धडकली. 1999 मध्ये हा अपघात झाला होता. या अपघातामुळे तिचा चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.तिचा चेहरा पूर्णपणे बिघडला होता. या अपघातामुळेच ती बॉलिवूडपासून दूर गेली. योग्य उपचार घेतल्यानंतर महिमा बरी झाली मात्र तोपर्यंत तिचे बॉलिवूड करिअर संपलेले होते.
मध्यंतरी महिमा मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आली होती. त्यावेळी महिमाला पाहून अनेकांना धक्काच बसला होता. वाढलेल्या वजनामुळे महिमा असल्याचा कोणालाही विश्वास बसला नव्हता. मात्र आता महिमाने स्वतःवर मेहनत करत ग्लॅमरस लूक मिळवला आहे. त्यामुळे पूर्वी इतकी सुंदर दिसत नसली तरी मनमौजी अंदाज पाहून चाहतेही खुश होतात. महिमा चौधरीने २००६ साली मुंबईतील आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांतच तिने मुलीला जन्म दिला. महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, अशी चर्चा यानंतर रंगली. पण आता महिमा बॉबीपासून विभक्त झाली आहे. २०१३ मध्ये बॉबी आणि महिमा विभक्त झाले. आता महिमा सिंगल मदर आहे.