'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:13 PM2023-12-21T13:13:26+5:302023-12-21T13:13:50+5:30
एकीकडे ट्विटरवर डंकीचं कौतुक होतंय तर दुसरीकडे थिएटरबाहेर येऊन लोकांनी निराशाही व्यक्त केली आहे.
शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'डंकी' (Dunki) सिनेमा आज सर्वत्र रिलीज झाला आहे. अनेकांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला असून सिनेमावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. '3 इडियट्स', 'पीके', 'मुन्नाभाई एमबीबीएस' सारखे हिट सिनेमे देणाऱ्या राजू हिरानींसोबत पहिल्यांदाच शाहरुखने काम केले आहे. २०२३ या वर्षात शाहरुखने आधीच दोन ब्लॉकबस्टर हिट दिले आता डंकी कडून त्यालाही अपेक्षा आहेत. या सिनेमा हिट झाला तर त्याची हॅट्रिक होणार आहे. 'डंकी' बघून आलेल्या प्रेक्षकांमध्ये अनेकांनी सिनेमाचं कौतुक केलं आहे पण काहींना मात्र सिनेमा अजिबात आवडला नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
एएनआयने घेतलेल्या प्रतिक्रियांमध्ये अनेक प्रेक्षकांनी 'डंकी'ने निराश केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे ट्विटरवर डंकीचं कौतुक होतंय तर दुसरीकडे थिएटरबाहेर येऊन लोकांनी निराशाही व्यक्त केली आहे. विकी कौशलला सोडलं तर सिनेमात दुसरं काहीच नाही. राजू हिरानी यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हटलं आहे.
एक चाहता म्हणाला,'मी पूर्णपणे निराश आहे. कारण मला राजू हिरानी यांच्याकडून आशा होती. पण ते वेळेनुसार त्यांच्यात बदल करत नाहीएत. कारण त्यांचा सतत तोच फॉर्म्युला आणि तेच जोक्स आहेत. काही ठिकाणी बळजबरी रडवण्याचा प्रयत्न होतो पण काहीच वाटत नाही. पूर्ण सिनेमात शाहरुख सोडून सगळं चांगलं होतं. शाहरुखने खूप निराश केलंय. ज्या अपेक्षा होत्या तसं काहीच नाहीए. विकी कौशलसाठी फक्त २ स्टार देऊ.'
#WATCH | Mumbai | Moviegoers come out of Gaiety Galaxy Movie Theatre after watching actor Shah Rukh Khan starrer Dunki.
— ANI (@ANI) December 21, 2023
"Overall, it is very good. I liked the first half a lot, typical Rajkumar Hirani film. The second half is a little all over the place but overall a very good… pic.twitter.com/MKZIlUKF61
तर दुसरा चाहता म्हणाला,'मी शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे. मला जवान,पठाण कडून इतक्या अपेक्षा नव्हत्या पण मी खूप खूश होऊन बाहेर आलो होतो. पण डंकी पाहून मी कमालीचा निराश झालो आहे. काहीच भावना जाणवत नव्हत्या. विकी कौशलने फक्त मन जिंकलं.'
या सर्व प्रतिक्रियानंतर 'डंकी' बॉक्सऑफिसवर किती यश मिळवते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पहिल्याच दिवशी सिनेमा 45 कोटींचा व्यवसाय करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.