'आदिपुरुष'चा दुसरा ट्रेलर पाहून चाहते भारावले, करताहेत दिग्दर्शक ओम राऊतचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 02:28 PM2023-06-07T14:28:17+5:302023-06-07T14:32:12+5:30

अ‍ॅक्शनने भरलेल्या या दुसऱ्या ट्रेलरने सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

Fans praise Om Raut after seeing the last trailer of Adipurush | 'आदिपुरुष'चा दुसरा ट्रेलर पाहून चाहते भारावले, करताहेत दिग्दर्शक ओम राऊतचं कौतुक

'आदिपुरुष'चा दुसरा ट्रेलर पाहून चाहते भारावले, करताहेत दिग्दर्शक ओम राऊतचं कौतुक

googlenewsNext

 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा सध्या चर्चेचा विषय आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. दमदार व्हिएफएक्स, म्युझिक, खिळवून ठेवणारे शॉट्स पाहून रामायणात हरवून गेल्यासारखं होतं. अ‍ॅक्शनने भरलेल्या या दुसऱ्या ट्रेलरने सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक दिग्दर्शक ओम राऊतचे कौतुक करताना थकत नाहीत. 

500-600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाचा दुसरा ट्रेलर पाहून प्रेक्षक खूप भारावले आहेत. मोठ्या पडद्यावर जबरदस्त VFX सह रामायणाची कथा दाखवणारा 'आदिपुरुष' ची सगळीकडेच चर्चा आहे. फिल्मचा अ‍ॅक्शन ट्रेलर बघण्यासाठी हजारो प्रेक्षक तिरुपतीला जमा झाले. अभिनेता प्रभासने तिरुपती बालाजीचे दर्शन घेत अ‍ॅक्शन ट्रेलर लॉंच केले. हा अ‍ॅक्शन ट्रेलर २ मिनिट २४ सेकेंदांचा आहे. ट्रेलर पाहून अनेकांनी दिग्दर्शक ओम राऊतचे कौतुक केलं आहे.  

दरम्यान आदिपुरुष हा सिनेमा ज्या ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्यामध्ये हनुमानासाठी एक जागा रिकामी ठेवली जाईल, असं सांगण्यात येत आहे. आदिपुरुषच्या टीमने यासंदर्भात दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, "जिथे रामायणाचे पठण केले जाते, तेथे हनुमानाचे दर्शन होते. हा आमचा विश्वास आहे. या श्रद्धेला मान देऊन, प्रभासचा आदिपुरुष प्रदर्शित होणार्‍या प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवली जाईल."

प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत, क्रिती माता सीतेच्या भूमिकेत आणि सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा  देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे.
 

Web Title: Fans praise Om Raut after seeing the last trailer of Adipurush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.