चाहत्यांनी शेअर केला बॉलिवूडच्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीचा फोटो; क्षणात झाला व्हायरल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 18:10 IST2020-04-26T18:09:42+5:302020-04-26T18:10:29+5:30
अनेक कलाकारांच्या सिनेमांचं शूटिंग थांबलं असून ते सध्या काटेकोरपणे लॉकडाऊनचं पालन करत असताना दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर सध्या जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे.

चाहत्यांनी शेअर केला बॉलिवूडच्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीचा फोटो; क्षणात झाला व्हायरल!
कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. देशभरात लॉकडाऊन केल्यानं सर्वांना घरी राहावं लागत आहे. याचा परिणाम बॉलिवूडवरही झाला. अनेक कलाकारांच्या सिनेमांचं शूटिंग थांबलं असून ते सध्या काटेकोरपणे लॉकडाऊनचं पालन करत असताना दिसत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर सध्या जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे आणि यात बॉलिवूडच्या एका सुपरस्टार अभिनेत्री शाळेतला फोटो सोशल मीडियावर खुप मोठया प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा फोटो या अभिनेत्रीच्या फॅन क्लबकडून शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सर्वांची लाडकी दीपिका पदुकोण आहे. हा फोटो दीपिकाच्या शाळेच्या दिवसांमधला आहे. या फोटोमध्ये दिपिका स्कुल युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. हा तिचा लुक पाहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा फोटो शाळेतल्या कोणत्या तरी इव्हेंट दरम्यान क्लिक करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिसत असलेल्या इतर व्यक्ती तिचे शिक्षक असल्याचं बोललं जात आहे.
दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरश: पाऊस पडताना दिसत आहे. दीपिकाचा शाळेच्या दिवसांतला हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. याशिवाय दीपिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता.
सध्या दीपिका रणवीर सोबत मुंबईमध्ये असून लॉकडाऊनध्ये ती तिच्या आई-बाबांना खूप मिस करत आहे. त्यामुळे हे सर्व संपल्यावर ती सर्वात आधी आपल्या आई-वडीलांची भेट घेणार आहे. त्यानंतर ती शगुन बात्राच्या सिनेमा ‘इंटर्न’च्या तयारीला सुरुवात करेल. हा २०१५ मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या ‘इंटर्न’ सिनेमाचा हिंदी रिमेक असून यात दीपिकासोबत ऋषी कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.