चाहत्यांसाठी शेफाली शाहने स्वरचित कवितेतून उलगडली 'अजिब दास्तां'मधली आपली व्यक्तिरेखा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:17 PM2021-04-28T20:17:35+5:302021-04-28T20:18:20+5:30

'अजिब दास्तां'मधील शेफाली शाह आणि मानव कौलची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली.

For fans, Shefali Shah reveals her role of 'Ajib Dastan' in poem | चाहत्यांसाठी शेफाली शाहने स्वरचित कवितेतून उलगडली 'अजिब दास्तां'मधली आपली व्यक्तिरेखा

चाहत्यांसाठी शेफाली शाहने स्वरचित कवितेतून उलगडली 'अजिब दास्तां'मधली आपली व्यक्तिरेखा

googlenewsNext

नुकत्याच रिलीज झालेल्या 'अजिब दास्तां'मध्ये शेफाली शाहच्या उत्कृष्ट प्रदर्शनाचे खूप कौतुक होते आहे. यात तिने मानव कौलसोबत स्क्रीन शेअर केली असून यातील चार कथानकांमध्ये या कहाणीला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. 

अभिनेत्रीला चाहत्यांनी याविषयी विचारले की 'अजिब दास्तां' मध्ये तिची व्यक्तिरेखा अशी का होती? यावर उत्तरा दाखल अभिनेत्रीने यातील तिची व्यक्तिरेखा ‘नताशा’साठी सुंदर ओळी प्रस्तुत केल्या. या ओळींना तिने स्वरसाज दिला आहे. यात तिने म्हटलंय की, कैसे समजावू तुम्हे, झूठ नहीं बोला था मैंने, पर सच कहेने देर कर दी, उंगलियोंने तो सब कुछ कह ही दिया था, बस तुम्हारे हाथों की लकीरों को, मैंने थामने में देर कर दी, जो महसूस तुमने किया था वही मैंने भी मेहसूस कर रही हूं, पर उस एहसास को मुकम्मल करने मे देर कर दी, आँखो से इझहार कर ही दिया था मैंने, पर हा इकरार करने में देर कर दी, माफी भी नही माँग सकती तुमसे, पर इस बार तो गुजारिश करने में भी देर कर दी.

निश्चितच, शेफाली शाहने आपला आवाज आणि या शोमधील छायाचित्रांना आतिशय सुंदरतेने मांडत त्यातील एकटेपणाला पूर्ण केले आहे. एक सुंदर कहाणी आणि प्रेक्षकांचे मिळणारे कौतुक या गोष्टींचा पुरावा आहे कि शेफाली शाहने आपल्या चाहत्यांच्या मनात कशी आपली जागा निर्माण केली आहे.  

अभिनेत्री शेफाली शाह लवकरच ‘डार्लिंग्स’मध्ये आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबत झळकणार आहे. याशिवाय ती ‘ह्यूमन’, ‘दिल्ली क्राइम २’ आणि आयुष्मान खुरानासोबत ‘डॉक्टर जी’ मध्ये दिसणार आहे.

Web Title: For fans, Shefali Shah reveals her role of 'Ajib Dastan' in poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.