फराह खान गेली आंब्याच्या खरेदीला, पण एका चुकीमुळे झाली सोशल मीडियावर ट्रोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:52 AM2021-03-24T11:52:06+5:302021-03-24T11:53:49+5:30
फराह खानचा हा व्हिडिओ काहीच तासांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फराह खान नुकतीच आंब्याच्या खरेदीसाठी बाहेर पडली होती. तिचा हा व्हिडिओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फराहला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
या व्हिडिओत आपल्याला फराह आंब्याच्या दुकानात दिसत आहे. फराहने टी-शर्ट आणि पँट घातली असून तिचा हा लूक खूपच छान दिसत आहे. तिने तिच्या चेहऱ्याला मास्क देखील लावला आहे. पण तिच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
फराह या व्हिडिओत आंब्याच्या दुकानात जाऊन आंब्याचा दर विचारताना दिसत आहे. त्यानंतर ती फळविक्रेत्याला चांगले आंबे दे... असे बजावताना दिसत आहे आणि तेवढ्यात ती दोन आंबे हातात घेऊन त्याचा वास घेताना दिसत आहे. यासाठी ती तिच्या चेहऱ्याचा मास्क काढत आहे. हे पाहून आता सोशल मीडियावर तिला चांगलेच सुनावले जात आहे.
मास्क काढून आंब्याचा वास कोण घेतं, ते ही महाराष्ट्रात... या कोरोनाच्या परिस्थितीत... असे एका यूझरने फराहला विचारले आहे तर एकाने कॉमन सेन्स बाजूला ठेवून आंब्याची खरेदी केली का असे एकाने तिला सुनावले आहे. इन्फेक्शन तर नाकापर्यंत पोहोचलं... तसेच मास्क घालून काय उपयोग झाला असे प्रश्न विचारत फराहला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.