जेव्हा फोनवर रडत होती फराह खान; शूटिंग मध्येच सोडून शाहरुख पोहोचला डायरेक्टरच्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 14:59 IST2023-06-06T14:58:37+5:302023-06-06T14:59:49+5:30
Farah Khan And ShahRukh Khan : शाहरुख खानची जुनी मैत्रीण आणि फिल्ममेकर फराह खानने आपल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये खुलासा केला होता की, शाहरुख खऱ्या आयुष्यातही थेरेपिस्टसारखाच आहे.

फोटो - news18 hindi
जर तुम्ही आलिया भट्ट आणि शाहरुख खानचा 'डियर जिंदगी' चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल की या चित्रपटात शाहरुख खान डॉक्टरच्या भूमिकेत आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की, सर्वांच्या हृदयावर राज्य करणारा किंग खान खऱ्या आयुष्यातही असाच आहे. शाहरुख खानची जुनी मैत्रीण आणि फिल्ममेकर फराह खानने आपल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये खुलासा केला होता की, शाहरुख खऱ्या आयुष्यातही थेरेपिस्टसारखाच आहे.
सध्या फराह खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फराह खान तिचा मित्र शाहरुखचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे. दिग्दर्शक सांगतो की, शाहरुख खानने तिला तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात हाताळले. "माझे वडील नाहीत, पण त्यांनी शाहरुखला माझी काळजी घेण्यासाठी पाठवलं आहे" असं ती म्हणते.
फराह खान म्हणते की, "मला अजूनही एक प्रसंग आठवत आहे जेव्हा मी एका भावनिक धक्क्यातून जात होते. मला माहीत नाही की हे तुला आठवतं की नाही. कारण तू मला अनेक आघातातून जाताना पाहिलं आहेस. मी फोनवर रडत होते आणि अर्ध्या तासात तू तुझं शूट सोडलंस. तू माझ्याशी तासभर बसून बोललास. ती सर्वोत्तम थेरपी होती."
फराह खानने शाहरुख खान, सुष्मिता सेनच्या 'मैं हूं ना' या चित्रपटातून डायरेक्टर डेब्यू केला. त्यानंतर दोघांनी 'ओम शांती ओम' आणि 'हॅपी न्यू इयर' सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. फराह आणि शाहरुख नेहमीच खूप चांगले मित्र आहेत. मात्र, याचदरम्यान त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार देखील आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.