​फराह खान म्हणते, माझ्या बायोपिकसाठी कंगना राणौतचं बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 08:36 AM2017-05-23T08:36:08+5:302017-05-23T14:06:08+5:30

कोरिओग्राफर, दिग्दर्शिका, अभिनेत्री अशा अनेक भूमिकेत दिसलेली फराह खान हिला अलीकडे बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण झालीत. या २५ वर्षांत ...

Farah Khan says Kangana Ranaut best for my biopic! | ​फराह खान म्हणते, माझ्या बायोपिकसाठी कंगना राणौतचं बेस्ट!

​फराह खान म्हणते, माझ्या बायोपिकसाठी कंगना राणौतचं बेस्ट!

googlenewsNext
रिओग्राफर, दिग्दर्शिका, अभिनेत्री अशा अनेक भूमिकेत दिसलेली फराह खान हिला अलीकडे बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण झालीत. या २५ वर्षांत चाहत्यांना प्रभावित करण्यात फराहने कुठलीही कसर सोडली नाही. बॅक स्टेज डान्सरपासून सुरु झालेला फरहाचा प्रवास आता यशस्वी मुक्कामाला पोहोचला आहे. फराहचे आयुष्य अनेक चढऊतारांनी भरलेले आहे. निश्चितपणे तिचे आयुष्य पडद्यावर पाहणे इंटरेस्टिंग असेल. अशात फराहच्या आयुष्यावर बायोपिक आले तर कुणाला आनंद होणार नाही? पण हे बायोपिक आले तर त्यात फराहची भूमिका कुठली अभिनेत्री साकारेल. किंबहुना आपली भूमिका कुठल्या अभिनेत्रीने साकारावी, असे फराहला वाटेल? नेमका हाच प्रश्न फराहला विचारण्यात आला. यावर तिने कुणाचे नाव घेतले माहितीयं? कंगना राणौत. होय, माझ्या आयुष्यावर कुणाला बायोपिक बनवावेसे वाटेल की नाही, मला ठाऊक नाही. पण ‘पिंक’ चित्रपटाचे लेखक रितेश यांना माझ्या आयुष्यावर लिहायचे आहे. माझे अख्खे आयुष्य अतिशय फिल्मी राहिलेले आहे. माझे बायोपिक बनलेच तर कंगना राणौत हीच माझी भूमिका उत्तम साकारू शकेल, असे मला वाटते. माझे केसही तिच्यासारखेच कुरळे होते, असे फराह म्हणाली.
म्हणजे, फराहने आपले मत कंगनाच्या पारड्यात टाकलेय. खरे तर फराहने अगदी योग्य अभिनेत्रीचे नाव घेतले. खरोखरीच फराहचे बायोपिक आले तर कंगना यातील तिच्या भूमिकेत जीव ओतल्याशिवाय राहणार नाही. शेवटी भूमिका पडद्यावर हुबेहुब जिवंत करणे, हीच तर कंगनाची खासियत आहे. आता बघू, फराहच्या भूमिकेत कंगनाला पाहण्याचा योग कधी आणि कसा येतो ते. तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच.
 

Web Title: Farah Khan says Kangana Ranaut best for my biopic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.