OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 11:00 AM2022-06-12T11:00:07+5:302022-06-12T11:00:59+5:30

Katrina Kaif, Vicky Kaushal : लग्नाआधी कतरिना कैफच्या आयुष्यात दुसरीच व्यक्ती होती. विकी कौशलही एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. पण तो भूतकाळ झाला. लग्नानंतर कतरिना व विकी दोघंही आनंदात संसार करत आहेत.

Farah Khan sharing candid picture with Vicky Kaushal katrina kaif reacted | OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड

OMG! लग्नाच्या 6 महिन्यानंतर कतरिना-विकीच्या आयुष्यात ‘तिची’ एन्ट्री? वाचा काय आहे भानगड

googlenewsNext

लग्नाआधी कतरिना कैफच्या (Katrina Kaif) आयुष्यात दुसरीच व्यक्ती होती. विकी कौशलही (Vicky Kaushal ) एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. पण तो भूतकाळ झाला. लग्नानंतर कतरिना व विकी दोघंही आनंदात संसार करत आहेत. दोघांचंही नातं घट्ट आहे. विकी हा कतरिनाचा ‘ड्रिम मॅन’ आहे आणि त्याच्याबद्दल तिच्या मनात कोणतीही भीती नाही. आपला नवरा आपल्याला आयुष्यात कधीही धोका देणार नाही, ही खात्री तिला आहे. म्हणूनच फराह खानला (Farah Khan) तिने ‘इजाजत है’ म्हणत अगदी बिनधास्त मंजुरी दिली आहे. आता ही काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल.

तर विकी कौशल सध्या क्रोएशियामध्ये आहे. येथे तो आपल्या एका प्रोजेक्टच्या शूटींगमध्ये बिझी आहे. सोबत फराह खानही आहे. फराहने कतरिनाची फिरकी घेण्यासाठी एक पोस्ट शेअर केली. तिने विकीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कतरिनाला टॅग करत, तिच्या नावे एक मॅसेजही लिहिला. ‘सॉरी कतरिना, विकी कौशलला दुसरी कोणी मिळाली आहे,’असं तिने लिहिलं. ही दुसरी कोणी कोण तर फराहचा इशारा तिच्या स्वत:कडे होता.

यावर कतरिनाने बिनधास्त उत्तर देत फराहला क्लिनबोल्ड केलं. ‘तुला परवानगी आहे, फराह खान,’ असं कतरिनाने फराहला उत्तर देताना लिहिलं.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर कतरिना कैफकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. फोन भूत, मेरी क्रिसमस, टायगर 3 अशा चित्रपटात ती झळकणार आहे. विकी कौशलचं म्हणाल तर डंकी या चित्रपटाशिवाय आनंद तिवारीच्या एका सिनेमात विकी दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. याशिवाय विकीजवळ आणखी दोन सिनेमे आहेत. 

Web Title: Farah Khan sharing candid picture with Vicky Kaushal katrina kaif reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.