'म्हातारी झालीस, लग्न करून मुलं होण्याचं वय निघून गेलं', वयाच्या ४३व्या वर्षी आई झाल्यामुळे फराहला ऐकावे लागले टोमणे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 01:38 PM2023-05-05T13:38:49+5:302023-05-05T13:46:09+5:30
फराह खान म्हणते, मी एक स्त्री आहे, म्हणून मला खूप ऐकावे लागले.
बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ती नेहमीच खुलेपणानं आपलं मत सोशल मीडियावर मांडतं असते. अलीकडे फराहने समांथाच्या एका जाहिरातीचे कौतुक केले, ज्यामध्ये त्याच्याकडे पाहणाऱ्या दोन महिला एकमेकांना म्हणतात की मुलींनी वेळेवर लग्न केले पाहिजे. ज्यावर समांथा म्हणते, 'लग्न वेळेवर नको तर त्यांच्या इच्छेनुसार व्हावे'.
फराह खानने वयाच्या ४० वर्षानंतर तिच्यापेक्षा लहान मुलाशी लग्न केले होते, त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. अनेक वर्षांनंतर तिने आपल्या मनातील व्यथा लोकांसमोर मांडली आहे. इस्टाग्रामवर समांथाची जाहिरात शेअर करताना फराह म्हणाली की, संपूर्ण जगाला महिलांची समस्या आहे.
फराहने तिच्या इंस्टाग्रामवर समांथाची जाहिरात शेअर केली आणि लिहिले की हे पाहून मला माझे ते दिवस आठवले जेव्हा माझ्याबद्दल वाईट बोलले गेले होते.' मला यशस्वी कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका म्हणून माझा अपमान करण्याचा प्रयत्न होता. मी एक स्त्री आहे, म्हणूनच मला खूप ऐकावे लागले. मला सांगण्यात आले, 'तू कोरिओग्राफरसारखे कपडे घालत नाहीस. या क्षेत्रात येण्यासाठी तुझं वय खूप लहान आहे. मुली अॅक्शन चित्रपट बनवू शकत नाहीत. तुझं लग्न करण्याचं आणि मुलं होण्याचं वयं सुद्धा निघून गेलंय.'
फराह खानने वयाच्या ४० व्या वर्षी तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान चित्रपट निर्माता शिरीष कुंदरशी लग्न केले. वयाच्या 43 व्या वर्षी ती तीन जुळ्या मुलांची आई देखील झाली. अन्या, जार आणि दिवा अशी तिच्या मुलांची नावे आहेत. आज फराह तिच्या करिअरमध्येच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही खूप यशस्वी आणि आनंदी आहे.