फरहानच्या वेब सीरिजने उडवली प्रिती झिंटाची रात्रीची झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2017 06:59 AM2017-06-16T06:59:07+5:302017-06-16T12:29:07+5:30

प्रिती झिंटा सध्या संसारात रमली असली तरी बरीच चिंतेत आहे. स्वत:शी निगडीत अनेक सीक्रेट जगापुढे आलीत तर, या भीतीने ...

Farah's web series blown up in the night of Preity Zinta | फरहानच्या वेब सीरिजने उडवली प्रिती झिंटाची रात्रीची झोप!

फरहानच्या वेब सीरिजने उडवली प्रिती झिंटाची रात्रीची झोप!

googlenewsNext
रिती झिंटा सध्या संसारात रमली असली तरी बरीच चिंतेत आहे. स्वत:शी निगडीत अनेक सीक्रेट जगापुढे आलीत तर, या भीतीने प्रितीला घेरले आहे.  होय, एका वेबसीरिजने प्रितीची रात्रीची झोप उडवली आहे. अभिनेता, गायक, दिग्दर्शक आणि लेखक फरहान अख्तर यासाठी जबाबदार आहे. त्याचे असे आहे की, फरहान एक वेबसीरिज घेऊन येतो आहे. ही वेब सीरिज आयपीएलवर आधारित आहे. या सीरिजमुळे प्रिती चिंतेत आहे. इतकी की, फरहानला फोन करून, या वेब सीरिजमध्ये तू काय दाखवणार आहेस, हे विचारण्याची गरज प्रितीला वाटली.
‘एनसाईड एज’असे या वेब सीरिजचे नाव आहे. येत्या जुलैमध्ये यू ट्युब चॅनलच्या प्राईम व्हिडिओवर ती प्रसारित होणार आहे. चर्चा खरी मानाल तर फरहानची ही वेब सीरिज प्रितीच्या आयुष्यावर आधारित असल्याचे मानल जात आहे. यात फाऊंडरसोबतचे सेक्स सीन्स असल्याचे समजतेय. असे असेल तर यात प्रितीच्या आयुष्यातील अनेक रहस्ये जगापुढे येण्याची शक्यता आहे. प्रितीला असे व्हायला नकोय. आयुष्यातील काही सीक्रेट सीक्रेटच राहावी, असे तिला वाटतेय. त्यामुळे तिने फरहानला फोन करून, ही वेब सीरिज रिलीजआधी तिला दाखवली जावी, अशी गळ घातली असल्याचे कळतेय.

ALSO READ : ​जेन गुडइनफ होता, म्हणून प्रिती झिंटाने बदलला ‘तो’ निर्णय!

या वेब सीरिजचे डायरेक्टर करण अंशुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सीरिजमध्ये अनेक इंटरेस्टिंग सेक्स सीन्स आहे. अर्थात अंशुमनने सांगितल्यानुसार, या सीरिजचे प्रितीच्या आयुष्याशी काहीही देणेघेणे नाही. खरे तर प्रितीच नाही तर शिल्पा शेट्टी ही सुद्ध आयपीएल टीमची मालकीन होती. पण ही तिचीही कथा नाही. आता खरे काय, हे ही वेब सीरिज रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे. तोपर्यंत प्रतीक्षा!

Web Title: Farah's web series blown up in the night of Preity Zinta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.