बॉलिवूडमधील आणखी एक जोडी घटस्फोटाच्या वाटेवर, फरदीन खानचा १८ वर्षांचा संसार मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 02:03 PM2023-07-30T14:03:57+5:302023-07-30T14:04:31+5:30

गेल्या काही महिन्यांपासून दोघंही वेगळे राहत आहेत.

Fardeen Khan natasha madhvani parting ways after 18 years of marriage reason not known yet | बॉलिवूडमधील आणखी एक जोडी घटस्फोटाच्या वाटेवर, फरदीन खानचा १८ वर्षांचा संसार मोडणार?

बॉलिवूडमधील आणखी एक जोडी घटस्फोटाच्या वाटेवर, फरदीन खानचा १८ वर्षांचा संसार मोडणार?

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये लिंकअप्स आणि ब्रेकअप सतत सुरुच असतात. अनेक वर्ष संसार करणाऱ्या कित्येक जोड्या गेल्या  काही वर्षाच वेगळ्या झाल्या आहेत. हृतिक रोशन-सुझेन खान, मलायका अरोरा-अरबाज खान, फरहान अख्तर-अधुना, अर्जुन रामपाल यांसारख्या प्रसिद्ध जोड्यांचा घटस्फोट झाल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळी होण्याच्या मार्गावर आहे. बॉलिवूड अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) आणि पत्नी नताशा माधवानी (Natasha Madhvani) गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत आहेत. तर आता त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

 ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, फरदीन खान आणि नताशा माधवानी यांनी आपल्या १८ वर्षांच्या संसारातून मुक्त व्हायचं ठरवलं आहे. दोघांनाही वेगळं व्हायचं आहे. तसंच ते गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत. फरदीन खान मुंबईत त्याच्या आईसोबत राहतो तर नताशा लंडनमध्ये असते. तर आता अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या या निर्णयामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

Fardeen Khan, Natasha Madhvani Head For Divorce After 18 Years Of Marriage?

फरदीन खान एकेकाळी बॉलिवूडमध्ये चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या लुक्सवर चाहते फिदा होते. काही सुपरहिट सिनेमे केल्यानंतर फरदीन नशेच्या आहारी गेला. परिणामी त्याचं वजन वाढलं तो अनफीट दिसायला लागला. यामुळे सिनेमांच्या ऑफर्स येणं बंद झालं. फरदीनने 2005 साली नताशा माधवानीसह लग्नगाठ बांधली. हे लग्न अतिशय ग्रँड स्वरुपात झालं होतं. नताशा ही प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची मुलगी आहे. त्यांच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजर होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनंतर कपल एकमेकांपासून वेगळे होत असल्याच्या चर्चा आहेत.

Web Title: Fardeen Khan natasha madhvani parting ways after 18 years of marriage reason not known yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.